Join us

Fish Farming : मत्स्यबीजांची साठवणूक आणि पूरक खाद्याचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:04 IST

Fish Farming : मत्स्यबीज साठवणूक आणि पूरक खाद्य कशापद्धतीने दोघांचे व्यवस्थापन करावे, याबाबत जाणून घेऊयात... 

Fish Farming :मत्स्यबीजांची साठवणूक (Fish Breed) करण्यासाठी योग्य तयारी करणे आणि साठवणूक करण्याची पद्धत अवलंबणे आवश्यक आहे. मत्स्यबीजांची साठवणूक केल्याने मत्स्य उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर मत्स्य बीजांसाठी (Fish Farming Breed) पूरक खाद्यही असणे आवश्यक ठरते. मत्स्यबीज साठवणूक आणि पूरक खाद्य कशापद्धतीने दोघांचे व्यवस्थापन करावे, याबाबत जाणून घेऊयात... 

मत्स्यबीज साठवणूक :

  • शेततलावात पाणीसाठा झाल्यावर खाद्यमात्रा देणे आवश्यक असते. 
  • खत मात्रा दिल्यानंतर दोन ते तीन दिवसात तलावात नैसर्गिक खाद्य तयार झाल्यानंतर शेततलावात निवडक जलद वाढणाऱ्या माशांचे ५० मी.मी. आकाराचे बीज साठवणूक करणे आपेक्षित असते. 
  • मत्स्यबीज उपलब्धतेनुसार शेततलावात तीन, चार, सहा जातीच्या माशांचे बिज साठवणूक करून मत्स्यशेती करता येते. 
  • दर हेक्टरी मत्स्यबोटकलीचे प्रमाण वरील तक्त्याप्रमाणे असावे.
  • मत्स्यबीज संचयन करतांना पिशवीचे तोंड उघडल्यानंतर पिशवी शेततलावातील पाण्यात बुडवून दोन्ही पाणी एकत्र करून हळूहळू पाण्यात माशांचे पिल्ले स्वतःहून जातील अशा पध्दतीने सोडावेत. 
  • मत्स्यबीज शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वातावरणात सोडावेत.
  •  

पुरक खाद्य : 

  • शेततळी किंवा कृत्रिम तळी मत्स्यसंवर्धनासाठी पुरक खाद्य शेंगदाणापेंड, भाताची कणीकोंडा, तरंगते मत्स्यखाद्य, पॅलेटेड मत्स्यखाद्य, गिरणीचे पीठ, पोल्ट्रीखाद्य व शेतीतील उरलेल्या अन्नधान्याचा भरडा, तसेच अॅग्रीमीन फोर्ट पावडर याचा चांगल्याप्रकारे वापर करता येतो. 
  • शेंगदाणाढेप व भातकोंड यांचे समप्रमाण (१:१) असावे. खाद्य वापरावे प्रमाण हे संचयन केलेल्या मत्स्यबीजाच्या अंदाजीत वजनाच्या ३ ते ५ % असावे.
  • मत्स्यखाद्य पाण्यात भिजवून शेततलावात ठिकठिकाणी गोळे करून टाकावेत किंवा सदरचे खाद्य बॅग किंवा कांद्याच्या गोणीतून फिडींग/बास्केट फिडींग द्वारे दिल्यास माशांना सर्व खाद्य गरजेप्रमाणे मिळून खाण्याचे प्रमाण कळते व वेळेत खातात काय? खाद्याचा पुर्ण विनियोग होत आहे काय? याची पडताळणी करता येते. 
  • तसेच प्लास्टिक शेततळ्यात खाद्य तळाला जावून साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
  • कारण प्लास्टिक तलावात तळाला साठलेल्या अन्नाचे विघटन होत नाही. 
  • परिणामी पाणी दुषित होण्यास सुरूवात होवून अपेक्षित मत्स्योत्पादनावर परिणाम होतो. 
  • माशांची वाढ जलद व्हावी, यासाठी पुरक खाद्याची मात्रा ५०० ग्रॅम वाढ होईपर्यंत साठवणूक केलेल्या माशांचे पिल्लांचे वजनाचे ५ टक्के व त्यानंतर ३ टक्के प्रमाणात मत्स्यखाद्याची मात्रा देण्यात यावी.
  • प्रतिहेक्टर जलक्षेत्राकरीता सर्व घटकांचा समावेश असलेले म्हणजेच शेंगदाणा ढेप, भातकोंडा, मत्स्यखाद्य पॅलेटेड, अॅग्रीमीन पावडर, गिरणीचे पीठ, यांचे मिश्रण असलेले खाद्य असावे.
  • माशांना द्यावयाचे पुरक खाद्याचे मिश्रण दिलेल्या प्रमाणानुसार दिवसातून सकाळ, दुपार, सायंकाळ असे तीन वेळा विभागून द्यावे. 
  • त्यामुळे तलावातील सर्व माशांना आवश्यकतेनुसार खाता येते व योग्य प्रमाणात वाढ मिळते.

- सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीमच्छीमार