Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Fish Processing : गोड्या पाण्यातील माशांवर प्राथमिक प्रक्रिया, गोंदिया जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

Fish Processing : गोड्या पाण्यातील माशांवर प्राथमिक प्रक्रिया, गोंदिया जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

Latest news fish farming Primary processing on fresh water fish, first project in Gondia district  | Fish Processing : गोड्या पाण्यातील माशांवर प्राथमिक प्रक्रिया, गोंदिया जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

Fish Processing : गोड्या पाण्यातील माशांवर प्राथमिक प्रक्रिया, गोंदिया जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

Fish Processing : गोंदिया जिल्ह्यात हे क्लस्टर उभारणीनंतर सात हजार टन माशांची आयात कमी करता येणार आहे.

Fish Processing : गोंदिया जिल्ह्यात हे क्लस्टर उभारणीनंतर सात हजार टन माशांची आयात कमी करता येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Fish Processing : गोड्या पाण्यातील मासोळींवर (Fish Processing) आधुनिक पद्धतीने प्राथमिक प्रक्रिया करणारा प्रकल्प अर्जुनी मोरगावच्या एमआयडीसीत उभारला जाणार आहे. हा देशातला पहिला प्रकल्प असल्याचा दावा आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय व्हिएतनाममधून होणारी ७ हजार टन माशांची आयात कमी होणार आहे. व्हिएतनाममधून ६० हजार टन गोठवलेल्या बासा माशांची आयात केली जाते, ज्याचे मूल्य १५०० कोटी रुपये आहे. क्लस्टर उभारणीनंतर सात हजार टन माशांची आयात कमी करता येणार आहे.

गोंदिया जिल्हा (Gondiya District) हा तलावांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ३७२२ हंगामी व ३३० बारमाही जलसाठे आहेत. विदर्भातील २५ टक्के तलाव व जलाशय एकट्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, सर्वाधिक ५९ जलसाठे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आहेत. विदर्भात आधुनिक मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाचा अवलंब करून जलस्रोत क्षेत्रातून मत्स्य उत्पादन वाढवता येऊ शकते. यासाठी माशांवर आधुनिक प्रक्रिया करून त्याची शेल्फ लाइफ वाढविण्याच्या उद्देशाने निमगावच्या एमयाडीसीमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

उद्योग विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लघु उद्योग समूह विकास कार्यक्रमांतर्गत फिश प्रोसेसिंग क्लस्टरचा प्रस्ताव विदर्भ फिश असोसिएशनकडून पूर्णत्वास येणार आहे. गोड्या पाण्यातील गोठवलेल्या माशांचे समर्पित युनिट भारतात नाही. हा व्यवसाय ताजे पकडलेले मासे व शीत माशांच्या व्यवसायांपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे परस्पर स्पर्धा नाही. याची थेट स्पर्धा व्हिएतनामवरून आयात होणाऱ्या बासा माशांसोबत आहे: परंतु गोठलेल्या माशांना व्हिएतनामवरून भारतात आणण्याकरिता लागणारे समुद्री जहाज भाडे व त्यावर भारत सरकारद्वारा आकारलेल्या ३० टक्के अबकारी करामुळे व्हिएतनामवरून भारतात आयातीत गोठलेल्या माशांसोबत थेट स्पर्धा नाही. त्यामुळे स्थानिक उत्पादन हे व्हिएतनामच्या तुलनेत स्वस्त पडणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय  आहेत? 
सामूहिक सुविधा केंद्रात वर्षाकाठी १५ हजार टन गोड्या पाण्यातील मासोळ्यांवर पूर्व प्रक्रिया करून त्यांना गोठवून जतन करण्याची क्षमता आहे. यामुळे गोठवलेले मासे १८ महि- न्यांपर्यंत टिकून राहणार आहेत. ४० उद्योजकांचे वैयक्तिक बर्फाचे कारखाने, मत्स्य खाद्य कारखाने, शीतगृह व प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्याची योजना आहे. दोन हजार लोकांना प्रत्यक्ष व तीन हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. मासेमारांना अधिक उत्पन्नातून जास्त नफा मिळणार आहे. 

गोड्या पाण्यातील माशांवर प्राथमिक प्रक्रिया करणारा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. माशांच्या पोटातील आतड्यांचा वापर मत्स्य खाद्यासाठी प्रस्तावित आहे. याशिवाय फिश स्केलचा वापर कॉस्मेटिक व जिलेटिन उद्योगासाठी प्रस्तावित आहे. गोठवण्याकरिता अयोग्य लहान मासे वाढवून त्याचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यवर्धन करण्याचे प्रस्तावित आहे. सुक्या लहान माशांची बाजारपेठ ईशान्य भारतात आहे. तेथे हे मासे निर्यात होऊ शकतात. 

मासोळी क्लस्टरचे लाभ 

मासोळीला विभिन्न प्रकारच्या गोठवण उत्पादनात परिवर्तित केल्यामुळे उच्च दर्जाचे मूल्य संवर्धन होणार आहे. प्राथमिक मासोळी प्रक्रिया युनिट, आइस फॅक्टरी, मत्स्य खाद्य युनिट, माशांसाठी शीतगृह व रेफ्रिजरेटेड ट्रक यूनिट्स हे लोकांना वैयक्तिक व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकतात.

Web Title: Latest news fish farming Primary processing on fresh water fish, first project in Gondia district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.