Join us

Fish Seed Centre : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, तोंडापूर केव्हीकेत मत्स्यबीज निर्मिती केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 2:55 PM

Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मत्स्यबीज निर्मिती केंद्राची (Fish Seed Center) स्थापना करण्यात आली आहे.

Hingoli KVK : गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादनात (Fish production) शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे मत्स्यबीजांची मागणी देखील वाढू लागली आहे. आता हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मत्स्यबीज निर्मिती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालन व्यवसाय कारण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. 

या प्रजनन केंद्राचे उद्घाटन मा. खासदार ऍड. शिवाजीराव माने यांनी केले. त्यावेळी सुमारे 100 ब्रुडर्स ला प्रेरित प्रजनन प्रक्रियेद्वारे प्रेरित करण्यात आले. आणि त्यापासून सुमारे 60 लाख अंडी पुंजाची निर्मिती करण्यात आली. त्याची वाढ आणि संगोपन करणे कृषी विज्ञान केंद्राच्या Kruhsi Vidnyan Kendra) प्रक्षेत्रावर सुरू आहे.

कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे मत्स्यबीज निर्मिती केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून आर्थिक सहकार्य सुद्धा लाभले आहे. पुढील महिनाभरात या मत्स्यबीज केंद्रातून शेतकऱ्यांना बीज देखील खरेदी करता येणार आहेत. जवळपास शंभरहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. या प्रजनन केंद्राला जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय उपायुक्त श्रवण व्यवहारे यांनी भेट दिली. 

संपर्क साधण्याचे आवाहन 

हिंगोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील इतर सर्व मत्स्य व्यावसायिकांना विनंती आहे की, त्यांना मत्स्य बीजेची उपलब्धता त्याचप्रमाणे मत्स्य शास्त्रातील तंत्रज्ञानाविषयी काही अडचणी असतील तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि  प्रमुख यांनी केले आहे. 

टॅग्स :शेतीमच्छीमारहिंगोलीशेती क्षेत्र