Challenges facing Fishermen : देशभरात मत्स्यव्यवसाय समृद्ध होत चालला आहे. मत्स्यव्यवसायासोबतच (Challenges facing Fishermen) मत्स्यशेतीकडे देखील शेतकरी वळू लागला आहे. अशा स्थितीत मच्छिमारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात प्लास्टिक प्रदूषण, पारंपारिक मासेमारीतुन होणारे जलप्रदूषण (Water Pollution) आणि कार्बन उत्सर्जन, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि पर्यावरण संरक्षण ही मोठी आव्हाने आहेत.
अंतर्देशीय मत्स्यव्यवसायाने (Fisheries) समुद्रातून पकडलेल्या माशांच्या आकडेवारीला मागे टाकले आहे. 2014 पासून मत्स्यशेतीचे आकडे दुप्पट झाले असून उत्पादन 175 लाख टनांवर पोहोचले आहे. तर सागरी मासे पकडण्याचा आकडा लाख टन आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना (PM-MKSSY) योजनांमुळे शक्य झाले झाल्याचे असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग यांचे म्हणणे आहे.
आज समुद्रातील मासेमारीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मच्छिमारांच्या या आव्हानांवर मात करून त्यांचा नफा वाढवण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. विशेषतः पाच प्रकारच्या सागरी आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. प्लास्टिक प्रदूषणाप्रमाणेच पारंपारिक मासेमारी आणि जलप्रदूषणातून होणारे कार्बन उत्सर्जन, प्लास्टिक कमी करणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि पर्यावरण संरक्षण ही मोठी आव्हाने आहेत. सागरी माशांची मोजणी सुरू, शार्क माशांना वाचवण्याचे काम केले जाणार आहे.
मच्छिमारांपुढील आव्हाने
मच्छिमारी करताना सद्यस्थितीत प्लास्टिक प्रदूषण हा महत्वाचा मुद्दा आहे. अलीकडच्या काळात प्रदूषणामुळे सागरी मत्स्यव्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत. समुद्रातील वाढते प्लास्टिक सागरी परिसंस्थेसाठी मोठ्या समस्या निर्माण करत आहेत. एकट्या भारतात नाहीतर जगभरात, सागरी मत्स्यपालन धोक्यात असल्याचे संकेत आहेत.
मासेमारी आणि मासेमारीतून होणारे प्रदूषण ही सागरी आरोग्य आणि पाण्याची गुणवत्ता कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. समुद्रात सोडलेली जाळी, प्लास्टिक आणि नायलॉनपासून बनलेली असतात आणि ते विघटित होत नाहीत, ज्यामुळे ते व्यत्यय आणणाऱ्या वन्यजीव आणि परिसंस्थेला हानी पोहचवतात.
सध्या, प्रदूषण आणि महासागरातील आम्लीकरणामुळे किनारपट्टीच्या पाण्याचा सतत ऱ्हास होत आहे. ज्याचा पर्यावरणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. किनारपट्टीच्या पाणलोट क्षेत्रातील विविध विसर्जन, कचरा, स्त्रोत तसेच विविध औद्योगिक क्रियाकलापांच्या उत्पादनांमधून (खते, खाणकाम, तेल, सिमेंट इ.) प्रदूषण होऊ शकते. यामुळे समुद्री पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Winter Fish Farming : हिवाळ्यात मासेपालन करताना पाणी व्यवस्थापन कसे करायचे? वाचा सविस्तर