Join us

Shettale Fish Farming : शेततळ्यात मत्स्यपालन सुरु करायचंय? अशी करा पूर्वतयारी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:21 IST

Shettale Fish Farming : विविध प्रकारच्या तलावात मत्स्यशेतीचे (Fish Farming) तंत्रज्ञान विकसित असून शेततळ्यांत देखील मत्स्यशेती करणे शक्य आहे.

Shettale Fish Farming :  विविध प्रकारच्या तलावात जलाशयात मत्स्यशेतीचे (Fish Farming) तंत्रज्ञान विकसित आहे. मात्र आता शेततळ्यांत शेतकऱ्यांनाही मत्स्यशेती करणे शक्य आहे. शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन प्रकल्पांतर्गत, रोजगार हमी योजनेअंतर्गत व वैयक्तीकरित्या शेतकऱ्यांनी केलेल्या शेततळी (Shettale) निर्माण केलेली आहेत. 

या शेततळ्यांतून साधारण जूलै-फेब्रुवारी या काळात जलसाठा करून ठेवला जातो. पाणीसाठा मार्च ते जून या कालावधीत शेतीसाठी आवश्यकतेप्रमाणे वापरला जातो. मातीचे वेगवेगळे प्रकार असतात त्यात, जांभ्या दगडापासून तयार झालेल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. अशाच प्रकारे मुरमाड जमीनीतही पाणी वेगाने झिरपते. अशा वेळी प्लास्टीक कागदाचे अस्तर असलेली शेततळी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेली आहे. अशा शेततळ्यात मत्स्यशेतीस (Matsya Sheti) चांगला वाव आहे.

उद्देश काय आहेत?  

  • ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे,
  • उपलब्ध पाण्याचे नियोजनबध्दरित्या वापर करून मत्स्योत्पादनाद्वारे जिल्ह्याची तसेच राष्ट्रिय उत्पादकतेत वाढ करणे.
  • प्रथिनयुक्त सकस अन्न उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांचे मत्स्यशेतीतून मत्स्योत्पादन घेवून आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावणे.
  • जिल्ह्यात मत्स्यसंवर्धनास प्रोत्साहन देणे.

वरील उद्देश साध्य करण्याची जबाबदारी म्हणून शेततळीधारक शेतकऱ्यांनी शेततळीत मत्स्योत्पादन करणे आवश्यक आहे.

तांत्रीक पध्दतीने शेततळ्यातील मत्स्यशेती : 

  • शेततळी सुकविणे किंवा कोरडे करावे.
  • प्लास्टीक अस्तर नसलेल्या शेततळ्याची नांगरणी करावी, त्यामुळे मातीलील विषारी आणि निरूपयोगी वायुमुक्त होतील.
  • शेततळीत प्रथम पाणी घेतांना पाणी गाळून घ्यावे. जेणेकरून पणलोटक्षेत्र / विहीर / कॅनॉलद्वारे येणाऱ्या पाण्या बरोबर बेडूक, निकृष्ट जातीचे मासे, वाम, खेकडे, पाणसाप इ. मत्स्यबीज भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत यासाठी व्यवस्था करावी.
  • शेततळ्यात पाणी घेतल्यावर बीज संचयनापुर्वी १० ते १५ दिवस अगोदर चुणा योग्य प्रमाणात म्हणजेच २५० ते ५०० किलो प्रतीहेक्टरी मिसळावा. शेततळ्यातील पाण्याच्या / मातीचा सामु सहा पेक्षा जास्त असेल तर चुण्याची मात्रा हेक्टरी २५० किलो वापरावे. 
  • जर पाण्याचा / मातीचा सामू पाच ते सहा असेल तर चुण्याची मात्रा ५०० किलो प्रतीहेक्टर असावी. 
  • जर सामू पाच पेक्षा कमी असेल तर चुण्याची मात्रा प्रतीहेक्टर १००० किलो वापरावी.
  • शेततळ्यातील निकृष्ट जातीचे मासे (मत्स्यबीज भक्षक) काढून टाकावे, त्यासाठी ओढप जाळ्याचा वापर करावा किंवा ब्लिचींग पावडर प्रतिहेक्टर ३०० किलो, १ मीटर खोली असलेल्या पाण्याकरीता किंवा मोहाढेप हेक्टरी १५० ते २०० किलो या प्रमाणात वापरता येते. 
  • तसेच ब्लीचींग व मोहाढेप च्या वापराची तीव्रता १५ दिवस टिकत असल्याने त्या कालावधीत मत्स्यबीज साठवणूक करण्यात येवू नये.
  • मातीच्या शेततळ्यातील पाण्याची पातळी किमान २.०० ते २.५० मीटर असावी. 
  • प्लास्टीक अच्छादन असलेल्या शेततळ्यात ६ ते ७ मीटर व त्यापेक्षा अधिक पाणीसाठा असतो. 
  • शेततळ्यात नैसर्गीक खाद्य निर्माण होण्यासाठी शिफारशित मात्रेमध्ये खतखाद्याचा वापर करावा. 

 

- सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमच्छीमारकृषी योजना