Winter Fish Farming : मत्स्यपालन हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, यातून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. हिवाळ्याच्या काळात तापमानात (Temperature Down) घट झाल्याने माशांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होतो. या हंगामात मत्स्यपालनाकडे (Fish Farming) विशेष लक्ष आणि काळजी आवश्यक असते. या काळात कशी काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात....
१) पाण्याचे तापमान नियंत्रित करा
हिवाळ्यात पाण्याचे तापमान 20-28 अंश सेल्सिअस दरम्यान राखणे महत्वाचे आहे. जर तापमान खूप कमी झाले तर माशांची हालचाल कमी होऊ शकते. तलावाजवळ ग्रीन नेट किंवा पॉलिथिन शीट लावून पाणी गोठण्यापासून वाचवता येते. पाण्याची पीएच पातळी 7-8 च्या दरम्यान ठेवा. पीएच पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार समायोजित करण्यासाठी नियमितपणे तपासा.
२) तलावाची खोली, ऑक्सिजनकडे लक्ष द्या
हिवाळ्यात तलावाची खोली किमान 6-8 फूट असावी. खोल पाण्यात तापमान स्थिर राहते, जे माशांसाठी अनुकूल असते. हिवाळ्यात माशांचे आरोग्य राखण्यासाठी तलावाची नियमित स्वच्छता करावी. घाण, मृत झाडे आणि इतर कचरा काढून टाका, जेणेकरुन पाण्यात बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
३) योग्य आहार द्या
हिवाळ्यात माशांचे चयापचय मंदावते, त्यामुळे त्यांना कमी अन्न लागते. त्यांना हलका आणि पौष्टिक आहार द्या. तसेच हिवाळ्यात पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, त्यामुळे माशांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पाण्यात ऑक्सिजन वाढवण्यासाठी उपाययोजना करा.
४) योग्य माशांच्या प्रजाती
कॅटफिश, रोहू आणि ग्रास कार्प यांसारख्या प्रजाती हिवाळ्यात मत्स्यशेतीसाठी योग्य आहेत. या प्रजाती थंड पाण्यातही चांगल्या वाढू शकतात.
५) रोग प्रतिबंधक
माशांमध्ये बुरशीजन्य आणि जिवाणू संसर्गाचा धोका थंड हवामानात वाढतो. माशांची नियमित तपासणी करा आणि रोगाची चिन्हे दिसल्यास ताबडतोब उपचार करा.
६) थंड वाऱ्यापासून संरक्षण
थंड वाऱ्यामुळे तलावातील पाण्याचे तापमान झपाट्याने खाली येऊ शकते. तलावाभोवती दाट झाडे लावून किंवा कृत्रिम बॅरिकेड्स तयार करून थंड वाऱ्याला प्रतिबंध करा.
७) तांत्रिक मार्गदर्शन
काही अडचण आल्यास तज्ञांचा सल्ला घ्या आणि हिवाळी मत्स्यशेतीसाठी नवीनतम तंत्रज्ञान वापरा. आपण कृषी विज्ञान केंद्र किंवा स्थानिक मत्स्य विभागाशी संपर्क साधून उपयुक्त मार्गदर्शन घेऊ शकता.
पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...