Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Marine Fishery सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण प्रवेश कार्यक्रम जाहीर

Marine Fishery सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण प्रवेश कार्यक्रम जाहीर

Marine Fisheries, Sailing Training Admission Program Announced | Marine Fishery सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण प्रवेश कार्यक्रम जाहीर

Marine Fishery सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण प्रवेश कार्यक्रम जाहीर

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते.

या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षण शुल्क
या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी, पात्र प्रशिक्षणार्थी निकष
प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 
प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा.
प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे दिनांक २० जून २०२४ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहिती करिता संपर्क
सचिन भालेराव (मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा)
9920291237
जयहिंद सूर्यवंशी (यांत्रिकी निर्देशक)
7507988552

अधिक वाचा: Traditional Fishing आता खाडीकिनारी पारंपरिक मच्छिमारी सुरू होणार

Web Title: Marine Fisheries, Sailing Training Admission Program Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.