Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण

खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण

Want to start a crab farming business? Scientific training is available here | खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण

खेकडापालन व्यवसाय करायचाय? इथं मिळतंय शास्त्रीय प्रशिक्षण

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे khekada palan 'खेकडा पालन व्यवस्थापन' या विषयावर दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे khekada palan 'खेकडा पालन व्यवस्थापन' या विषयावर दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोकण प्रदेशातील स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह हा या प्रदेशाला लाभलेल्या विस्तृत किनारपट्टीच्या खाडीतील मासे, कोळंबी, मुळे, खेकडे इत्यादींच्या माध्यमातून होत असतो. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी मासे खेकडा संवर्धनाचे प्रकल्प ठिकठिकाणी कार्यान्वित आहेत.

यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थाजन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे.

परंपरागत शेतीची कास धरली पण वातावरणीय बदल, भेसळयुक्त बियाणे आणि शेतीतील उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे दमछाक झाली आता करायचे काय? हा यक्ष प्रश्न तरुण बेरोजगार, नवोद्योजक, मत्स्य व्यावसायिक यांचे समोर उभा ठाकला आहे.

या यक्ष प्रश्नाकडे लक्ष देऊन उत्तर शोधले आहे ते म्हणजे आपल्या पारसबागेत, घराच्या पडवीत, बंद असलेल्या गोठ्यात, एवढेच नाही तर अगदी आपल्या घरात अवघ्या १५० x १०० च्या जागेत २०० खेकड्यांचे संवर्धन.. होय खरंच ही किमया केली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे आधीनस्त असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या खेकडा प्रकल्पातील संशोधकांनी, याबरोबरच आपल्याला तलावातील खेकडा संवर्धन, तलावामध्ये, खाड्यांमध्ये तरंगत्या फायबर खोक्यांमधील खेकडा संवर्धन, खाडीतील पेन कल्चर पद्धतीने खेकडा संवर्धन, बांधकाम आणि आवश्यक यंत्र सामुग्री, खेकड्यांच्या विजाची ओळख, खेकड्यांचे खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, खेकड्‌याना उद्भवणारे आजार आणि उपाय, खेकड्‌यांची सुरक्षित काढणी, बांधणी आणि विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल वाबाबत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ शास्त्रज्ञ यांचेकडून शास्रोक्त माहिती, यशस्वी संवर्धक यांचे स्वानुभव कथन, प्रकल्प/प्रक्षेत्र भेट केली जाईल.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे 'खेकडा पालन व्यवस्थापन' या विषयावर दि. १८ ते २० जुलै, २०२४ या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामुळे खेकडा संवर्धनाद्वारे मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, तरुण बेरोजगार स्वतःची प्रगती साधू शकतील. यामुळे खेकडा उत्पादन वाढीस चालना मिळेल. म्हणूनच या उदात्त हेतूने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणाचे तपशील
नाव नोंदणी लिंक: https://forms.gle/6Fqe3Ew38FDedJBP8
प्रशिक्षण शुल्कः रु. ३,०००/-

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुरेश नाईक ८२७५४५४८२१
डॉ. हरिष धमगये ९५११२९५८१४

Web Title: Want to start a crab farming business? Scientific training is available here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.