Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

Five lakh milk producers in the district will get Diwali bonus through milk | दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो.

शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो.

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांच्या घरात सुमारे १५६ कोटी रुपये जात असल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या दिवाळीला दुधाचा सुगंध पाहायला मिळतो.

यंदा 'बिद्री', 'दत्त-शिरोळ'सह काही कारखान्यांनी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे. संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो.

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांच्या घरात सुमारे १५६ कोटी रुपये जात असल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या दिवाळीला दुधाचा सुगंध पाहायला मिळतो.

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, पण तितकाच खर्चिकही आहे. नवीन कपडे, फराळाचे साहित्य, दागदागिने आदींची रेलचेल घरोघरी असते. म्हणूनच यापूर्वी दिवाळी' म्हणजे नोकरदारांचा सण मानला जायचा. त्याला कारणेही तशीच होती.

मात्र, अलीकडील काळात दूध व्यवसायाच्या माध्यमातून दर दहा दिवसाला बिले येतातच, त्याचबरोबर गोकुळ' व 'वारणा' दूध संघाकडून कोट्यवधींचा दूध फरक दिला जातो. त्याशिवाय दूध संस्थांही नफ्यातून रिबेट देतात. त्यामुळे दूध उत्पादकांच्या घरी पैशाबरोबर दिवाळीचा आनंदही आला.

एकरकमी एफआरपीमुळे सणांचे पैसे बंद
साखर कारखाने उसाचे पैसे प्रत्येक सणाला थोडे थोडे द्यायचे. त्यातून दिवाळीला पैसे मिळत होते. मात्र, एकरकमी एफआरपीमुळे सणाला येणारे पैसे बंद झाले आहेत. यंदा 'बिद्री', 'दत्त-शिरोळ'सह काही कारखान्यांनी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे.

३५ हजार साखर कामगारांना बोनस
साखर कारखान्यांकडे ३५ हजार कामगार कार्यरत आहेत. कामगारांना किमान ८.३३ टक्के बोनस बंधनकारक आहे. कारखाने आपल्या कुवतीप्रमाणे ३० टक्क्यांपर्यंत देतात, सरासरी १५ टक्के जरी गृहित धरला तर कामगारांच्या घरात १४० कोटी रुपये जातात.

दिवाळीनिमित्त शेतकरी व साखर कामगारांच्या घरात असा येतो पैसा (कोटीत)
गोकुळ व वारणा - १५६.५२
प्राथमिक दूध संस्थांकडून - १३५.५०
साखर कारखाने (दुसरा हप्त्या) - १५६.५२
साखर कामगार - १४०

दूध संस्थांकडून 'पाडव्या'ला फरक
बहुतांशी दूध संस्था दोन टप्प्यात दूध फरक देतात. संघाकडून आलेला दिवाळीला तर संस्था नफ्यातून देण्यात येणारा फरक गुढीपाडव्यासह इतर सणाला दिला जातो.

बारा माहिने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जावी, यासाठी 'गोकुळ' नेहमीच जास्तीत जास्त परतावा देते. यावर्षी दूध फरकासह डिबेंचर्सपोटी ११३ कोटींचे वाटप केले. - योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ

Web Title: Five lakh milk producers in the district will get Diwali bonus through milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.