Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात

Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात

Gokul Dudh : Export of 210 tons of butter from Gokul Milk Union to Atena Milk Union in Azerbaijan | Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात

Gokul Dudh : गोकुळ दूध संघातून अझरबैजान देशातील अटेना दूध संघासाठी २१० टन लोणी निर्यात

'गोकुळ'च्या देशी लोण्याची परदेशातील नागरिकांना भुरळ पडली असून 'अझरबैजान' देशातील 'अटेना' दूध संघाने ४२० टन लोण्याची मागणी केली आहे.

'गोकुळ'च्या देशी लोण्याची परदेशातील नागरिकांना भुरळ पडली असून 'अझरबैजान' देशातील 'अटेना' दूध संघाने ४२० टन लोण्याची मागणी केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : 'गोकुळ'च्या देशी लोण्याची परदेशातील नागरिकांना भुरळ पडली असून 'अझरबैजान' देशातील 'अटेना' दूध संघाने ४२० टन लोण्याची मागणी केली आहे.

त्यातील २१० टन लोणी 'गोकुळ'दूध प्रकल्प येथून पाठवण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातून दुग्धजन्य पदार्थाची निर्यात सातत्याने वाढत आहे.

याचाच एक भाग म्हणून गोकुळने पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास यापूर्वी ४२ टन गायीचे देशी लोणी निर्यात केले होते.

या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता व चव अझरबैजान व शेजारील देशातील ग्राहकांना आवडल्याने गोकुळच्या देशी लोण्याला मागणी वाढू लागल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. यावेळी, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.

दूध पावडरला आफ्रिका, कतार मधून मागणी
'गोकुळ'च्या दुधाबरोबर पावडरलाही देशाअंतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. दूध पावडरला कतार, ब्राझील, आफ्रिका, बांगलादेश या देशांतून मागणी होत असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

Web Title: Gokul Dudh : Export of 210 tons of butter from Gokul Milk Union to Atena Milk Union in Azerbaijan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.