Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Grow Milk Production : गायीम्हशीचे दूध वाढवण्यासाठी 'या' गोष्टी करा; ५० ते २०० लिटरपर्यंत वाढू शकते दूध

Grow Milk Production : गायीम्हशीचे दूध वाढवण्यासाठी 'या' गोष्टी करा; ५० ते २०० लिटरपर्यंत वाढू शकते दूध

Grow Milk Production : Do 'these' things to increase cow's milk; Milk can increase from 50 to 200 liters | Grow Milk Production : गायीम्हशीचे दूध वाढवण्यासाठी 'या' गोष्टी करा; ५० ते २०० लिटरपर्यंत वाढू शकते दूध

Grow Milk Production : गायीम्हशीचे दूध वाढवण्यासाठी 'या' गोष्टी करा; ५० ते २०० लिटरपर्यंत वाढू शकते दूध

अनेक शेतकरी जनावरांचे दूध वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

अनेक शेतकरी जनावरांचे दूध वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

शेअर :

Join us
Join usNext

दुग्ध व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये जनावरांचे आजार, बदलते हवामान, दुधाचे पडते दर अशा अडचणींचा समावेश असतो. तर अनेक शेतकरी जनावरांचे दूध वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

जनावरांचे दूध वाढण्यासाठी आपण आपल्या गोठ्यातील काही बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष दिले तर त्याचा दूध उत्पादनावर परिणाम दिसून येऊ शकतो. आपल्या जनावरांचे दूध वाढवायचे असेल तर खालील सहा सूत्रांचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

1) वर्षातून दोन वेळा जनावरांचे खुर घासणे - यामुळे जनावरे वर्षातून 50 लीटर दूध जास्त देतात.

2) लसीकरण - योग्य वेळी लसीकरण केल्यास जनावरांचे वर्षातून 50 लीटर दूध वाढते.

3) जंतनाशक - जंताचे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषध दिल्यामुळे पन्नास लीटर दूध वाढते.

4) तापमान - गोठ्यातील तापमान संतुलित ठेवल्यामुळे आणि जनावरांसाठी फॉगरचा उपयोग केल्यामुळे वर्षभरात १०० लीटर दूध वाढते.

5) दगडी आजार - दगडी आजारावर कंट्रोल केलं तर वर्षभरात जनावरचे दूध 200 लिटर पर्यंत वाढू शकते.

6) जनावरांचा आहार - जनावरांची राईस प्लेट म्हणजे जनावरांना संतुलित आहार वेळेवर भेटला तर जनावरांचे दूध वर्षभरामध्ये 200 लीटरने वाढते.

माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)

 

Web Title: Grow Milk Production : Do 'these' things to increase cow's milk; Milk can increase from 50 to 200 liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.