Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

hi-tech agriculture in farming increased this year | यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

ठिबक, टिश्शूकल्चरकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जैन इरिगेशन कंपनीच्या तिमाही व सहामाहीचे आर्थिक अहवालातून समोर आले आहे.

ठिबक, टिश्शूकल्चरकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जैन इरिगेशन कंपनीच्या तिमाही व सहामाहीचे आर्थिक अहवालातून समोर आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा देशात मॉन्सून सरासरी ९४ टक्के झाला. देशातील अनेक भागांत तो समाधानकारक असला, तरी  भविष्यातील पावसाचा लहरीपणा ओळखून अनेक शेतकरीठिबक सिंचन सारख्या उच्च सिंचन तंत्रज्ञानाला वाढती पसंती देत आहेत. त्यामुळे यंदा हायटेक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत कार्यरत असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे एकल(Standalone) तसेच एकत्रित (Consolidated) निकाल ९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत जाहीर केले. त्यातून शेतकऱ्यांच्या उच्चतंत्रज्ञानाकडे वाढणारा कल समोर आला आहे.  दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या एकत्रित महसुलात २५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहित कन्सोलिडेटेड महसूल १,३६१.९ कोटी झाला, तोच गतवर्षी तिमाहीत १,०८२ कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा  कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ८.३ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत  तोच निव्वळ तोटा १९.५ कोटी रुपयांचा होता. 

सूक्ष्म सिंचन, टिश्शू कल्चर व प्लॅस्टिक पाईपना वाढती पसंती

प्लास्टिक व्यवसायात जल जीवन मिशन अंतर्गत चांगली मागणी, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पाईप्स, टिश्युकल्चर आणि भारत आणि परदेशातील खाद्य व्यवसायात बाजारपेठेतील वाटा वाढलेला आहे. देशांतर्गत व्यवसायातील भक्कम वाढ आणि उपकंपन्यांमधील चांगली कामगिरी यामुळे कंपनीला (2QFY24) या तिमाही कन्सोलिडेटेड आधारावर महसूलात २५.९ % वाढ आणि व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीच्या कमाई मध्ये ५६% वाढ झाली.  आर्थिक वर्षच्या दुसऱ्या तिमाही पावसाळा असल्याने शेतीविषयक कामे कमी असतात आणि त्यामुळे दुसऱ्या तिमाही मध्ये कंपनी इतर तिमाहीपेक्षा कमी महसुलाची नोंद करते. असे असून देखील कंपनीने स्टॅण्डअलोन महसुलात गत वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ नोंदविलेली आहे. गत वर्षापेक्षा या वर्षी व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीचा नफा ४५ टक्के झालेला आहे. 

कंपनीच्या पहिल्या सहामाही आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये 

  • एकूण महसुलात २२.६% ची वाढ.
  • हाय-टेक ऍग्री विभाग ६.५% ने वाढला.
  • पीई, पीव्हीसी पाईप प्लास्टिक विभागामध्ये ६२.५% ची लक्षणीय वाढ.
  • भाजीपाला निर्जलीकरण विभागात वाढ - भारतातील १०.६% तर विदेशातील व्यवसायात ९.६% वाढ.
  • कंपनीकडे एकूण  १,९९०.३ ₹ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ऍग्रीसाठी - ₹ ३४४.८ कोटी, प्लास्टिक विभाग व इनपुट उत्पादन यांच्यासाठी   ₹ ४६६.० कोटी आणि कृषी विभाग - ₹ १,१७९.५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.   

 

कंपनीने या सहामाहीत कन्सोलिडेटेड महसुलात २२.६ टक्क्यांनी वाढ करून ३,०६३.० कोटी इतकी नोंद केली आहे. या सहामाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ४४.९ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत तोच निव्वळ तोटा ७.७ कोटी रुपयांचा होता. कंपनीच्या हातात चांगल्या ऑर्डर्स आहेत. 

- अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन

Web Title: hi-tech agriculture in farming increased this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.