अहमदनगर जिल्ह्यातील दूध भेसळीविरोधात जिल्हा दुग्धविकास अधिकारी व अन्न व औषध उघडली असून, गेल्या दोन दिवसांत २४ संकलन केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली आहे. या प्रशासनाने संयुक्त मोहीम तपासणीदरम्यान दुधात भेसळ आढळून आल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे दूध भेसळ कराल तर कोठडीत जाल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राज्य सरकारचे आदेश
राज्यातील दूध भेसळीबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन दूध संकलन केंद्रावर छापे टाकून दूध तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सरकारकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात चार भरारी पथके स्थापन
अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा दुग्धविकास अधिकारी, अन्नसुरक्षा अधिकारी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडून जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांना अचानक भेटी देऊन दुधाचे नमुने घेण्यात येत आहेत.
दररोज ४५ लाख लिटर दुधाचे संकलन
जिल्ह्यातील मोठे ९, मध्यम १६१ अशा एकूण १६६ दूध संकलन केंद्रांवर ४२ ते ४५ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दूध बाहेर पाठविण्यात येत असून, दररोज ४५ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.
चार संकलन केंद्रात नासलेले दूध
- भरारी पथकाने गेल्या दोन दिवसांत २४ ठिकाणी भेटी देऊन दुधाचे नुमने तपासले. या तपासणीदरम्यान देहरे येथील दोन संकलन केंद्रे, अकोले आणि बहिरवाडी (ता. कर्जत) येथील संकलन केंद्रावर नासलेले दूध आढळून आले.
- इतर संकलन केंद्रातील दुधाची तपासणी करण्यात येत असून, भेसळ केली जात आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
एक हजार लिटर दूध केले नष्ट
भरारी पथकाने जिल्ह्यातील विविध दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन खराब नसलेले एक हजार लिटर दूध नष्ट केले आहे. या दुधाचा आंबट वास आल्य पथकाला शंका आली. पथकाने तपासणी केली असता हे दूध खराब आढळून आल्याने ते नष्ट करण्यात आले आहे.
भेसळ आढळल्यास गुन्हा
दुधात भेसळ आढळून आल्यास संबंधितांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येत असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार चार पथके स्थापन करण्यात आलेली आहे. या पथकांनी गेल्या दोन दिवसांत २४ ठिकाणी भेटी देऊन दुधाची तपासणी केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असून, दुधाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. - विकास गारुडकर, अतिरिक्त जिल्हा दुग्ध विकास अधिकारी