पशुपालक व शेतकरी यांना चांगल्या प्रतिच्या गोठीत रेतमात्रा, पशुखाद्य, लस, वैरणीचे बियाणे इत्यादी बाबी जनावरांचे आरोग्य सुधारून त्यांची उत्पादन वाढीस अशी उपयुक्त संगणक प्रणाली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद (गुजरात) NDDB यांनी मे. इन्फोसिस लि. कंपनी, बंगलुरू यांचे संयुक्त विद्यामाने सदर संकणक प्रणाली विकसित केली आहे. सर्वप्रथम या प्रणालीमध्ये पशुधनाची ओळख महत्वाची आहे. त्याकरीता पशुधनाच्या/जनावरांच्या कानात बारा अंकी बिल्ला (टॅग) मारणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर जनावराची एकदाच इनाफ प्रणालीमध्ये नोंद करण्यात येत.
नोंदीमधील समाविष्ट बाबी:
पशुपालकाचे नाव, जनावराची जात, वय, रंग, वेताची संख्या, गाभण/भाकड, शिंगे, शेपुट गोंडा इत्यादी बाबींची नोंद केल्यानंतर सदर जनावराची नोंद पुर्ण होते.
इनाफमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा
१) कृत्रिम रेतनाच्या नोंदी
पशुपालकाने एकदा आपल्या जनावरांची नोंद ही इनाफ या संगाणक प्रणालीवर केलेनंतर काही सेकंदामध्ये कृत्रिम रेतनाच्या नोंद घेणेची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जनावर गाभण राहलेनंतर व व्यालेनंतरच्या नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे पशुपालकाकडे जन्माला आलेल्या वासराचे (नर/मादी) यांची वंशावळ कळते व मादी असल्यासकिती दुध उत्पादन देणार याचा अंदाज येत असतो.
२) दुध उत्पादन नोंदी
गाय/म्हैस व्याल्यानंतर पहीली दुध उत्पादनाची नोंद ही २१ दिवसाचे आत करणे क्रमाप्राप्त असते. त्यानंतर प्रत्येक महिन्यातुन एकदा (सकाळ/दुपार/सायंकाळ) अशाप्रकारे १० नोंदी पुर्ण करावयाच्या असतात. त्यामुळे सदर जनावरांची एका वेतातील दुध उत्पादन क्षमता या प्रणाली अंतर्गत काएली जाते. तयामुळे पशुपालक निश्चीतपणे आपले जनावराची दुध उत्पादन क्षमता जाणुन घेऊ शकतो.
३) पशुस्वास्थ्य विषयक नोंदी
जनावरांचे लसीकरणांच्या नोंदी केल्यामुळे इतर राज्यात वाहतुक व बाजारात विक्रीसाठी जनावर नेणे/वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत नाही. तसेच इतर आजाराविषयक नोंदी देखील घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
४) पशुआहार संतुलन कार्यक्रम
सदर कार्यक्रमा अंतर्गत पशुपालकास आपल्या जनावरांना संतुलीत पशुआहार देण्यासाठी सल्ला उपलब्ध होत असतो. पशंपालकाकडे उपलब्ध वैरण (ऊसाचे वाडे, नेपीयर, केळीची पाने, चिंचेचा पाला, कांचन इत्यादी बाबी) तसेच पशुखाद्य घटक (सरकी पेंड, शेंगदाना पेंड, करडी पेंड, तीळ पेंड इ. बाबी) यांचे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद यांचे कडील उपलब्ध पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळेत सर्व बाबींचे विश्लेषण करुन उपलब्ध बाबी किती प्रमाणात द्याव्या याबाबत पशुपोषण ॲप मार्फत मार्गदर्शन केले जाते.