Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

Kukut Palan : How to increase income from improved breeds of hens in backyard poultry farming | Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

परसातील कुक्कुटपालनामध्ये कमी उत्पादन देणाऱ्या मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने सुधारित जातींचे कुक्कुटपालन फायदेशीर ठरते.

परसातील कुक्कुटपालनामध्ये कमी उत्पादन देणाऱ्या मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने सुधारित जातींचे कुक्कुटपालन फायदेशीर ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

परसातील कुक्कुटपालनामध्ये कमी उत्पादन देणाऱ्या मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने सुधारित जातींचे कुक्कुटपालन फायदेशीर ठरते.

कडकनाथ, असील, फ्रिजल, मानसोली, अंकलेश्वर, तेलीचेरी, मिरी इत्यादी कोंबड्यांच्या सुधारित जातींचे संगोपन वापर करून त्यांची उत्पादकता सुधारता येते. भारतातील संशोधन संस्थांनी विविध भागात वेगवेगळ्या कोंबड्यांच्या सुधारित जाती (गिरिराज, वनराज, कावेरी, ग्रामश्री, ग्रामप्रिया इ.) विकसित केल्या आहेत.

कसे कराल परसातील कोंबड्यांचे व्यवस्थापन backyard poultry

  • परसबागेमध्ये गावरान देशी कोंबड्यांपेक्षा सुधारित जातीच्या कोंबड्या जास्त अंडी देतात. साधारणतः देशी कोंबड्यांचे उत्पादन वर्षाकाठी ६० ते ७० अंडी असते. त्यामानाने सुधारित कोंबड्यांचे अंडी उत्पादन १०० ते १८० या दरम्यान असते.
  • सुधारित कोंबड्यांच्या जातीची वाढ गतीने होत असल्यामुळे मांस उत्पादनासाठी लवकर तयार होतात. गावरान देशी कोंबड्यांप्रमाणे सुधारित जातीसुद्धा प्रतिकूल वातावरणामध्ये तग धरून राहू शकतात.
  • कोंबडी संगोपन करताना संगोपन उपलब्ध धान्याचा विचार करून घरगुती खाद्य सूत्र तयार करावे. कारण आहार समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. वाया गेलेली ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, सुकट, तसेच शिंपले, मीठ, क्षार आणि जीवनसत्त्वे इत्यादींचा वापर करून परसबागेतील कोंबड्यांसाठी पूरक खाद्य बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • घरगुती तयार केलेले २५ ते ३० ग्रॅम पूरक खाद्य प्रति कोंबडी प्रति दिन द्यावे. दिवसातून दोन वेळा खाद्य विभागून दिल्यास कोंबड्यांचा आहार समतोल राखण्यास मदत होऊ शकते. कोंबड्यांना परसबागेतून फिरून जी पोषणतत्वे मिळू शकणार नाहीत अशी पोषणतत्त्वे पूरक खाद्यामार्फत मिळाल्यास अंडी, मांस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
  • सुरुवातीला उपलब्ध असलेल्या १५ ते २० कोंबड्यांमधून पुढच्या वर्षासाठी नवीन पिले निर्मितीसाठी खुडूक कोंबडीचा वापर केला जातो. परंतु आपण एकाच वेळेस साधारणतः चार ते पाच खुडूक कोंबड्याचा वापर करून जास्तीत जास्त पिलेनिर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी खुडूक कोंबडी कशी ओळखावी, फलित अंड्याची तपासणी कशी करावी, खुडूक कोंबडीसाठी वापरली जाणारी जागा कशी असावी, कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दलचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सुधारित कोंबड्यांचे लसीकरण, औषधोपचार, पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण, जंतनिर्मूलन, रात्री खुरड्यामध्ये कोंबड्यांना दिली जाणारी जागा इत्यादी गोष्टींची पूर्तता केल्यास उत्पादनात वाढ होते.
  • अंडी कवचाची प्रत सुधारणा आणि कोंबड्यांतील टोच्या मारणे, पिसे उपटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खाद्यामध्ये शिंपल्यांचा वापर करावा. रोजच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा वापर करावा.
  • नवीन पिले उत्पादित केल्यानंतर त्यामध्ये ५० टक्के नर व ५० टक्के मादी पिल्लांचा समावेश असतो त्यामुळे पैदाशीचे नर (प्रति १२ माद्यांमागे १ नर प्रमाणे) वगळून उर्वरित नरांची विक्री साधारणतः सहा महिन्यांनी करावी.
  • स्वतः तयार केलेल्या कोंबड्यांच्या पैदाशीसाठी नर न ठेवता शेजारील पक्षिपालकांच्या कळपामधील नवीन नर पैदाशीसाठी वापरावेत किंवा नवीन उत्तम प्रतीच्या संकरित कोंबड्यांची खरेदी करून त्यांचा समावेश आपल्या कळपामध्ये (प्रति १२ माद्यांमागे १ नर) केल्यास पुढील पिढीमध्ये तयार झालेल्या कोंबड्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. कोबड्याची अदलाबदल करावी किंवा नवीन सुधारित जातीचा कोंबडा वापरावा.
  • बरेच शेतकरी परसातील कुक्कुटपालन करत असताना दोन ते तीन वर्षापेक्षा जास्त वयाचा कोंबडा कळपामध्ये संकरण करण्यासाठी ठेवतात. परंतु दोन वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोंबड्याची वीर्य उत्पादनक्षमता कमी होऊ शकते.  प्रत्येक वर्षी नवीन कोंबड्याचा संक्रमणासाठी वापर करावा. त्यामुळे मिळणाऱ्या फलित अंड्याची संख्या वाढू शकते.

अधिक वाचा: जनावरांचे दूध वासावर जावू नये म्हणून हाताने दूध काढताना काय खबरदारी घ्यावी वाचा सविस्तर

Web Title: Kukut Palan : How to increase income from improved breeds of hens in backyard poultry farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.