Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

Latest News Average income of orange growers fell by 150 percent in five years | संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

मागील पाच वर्षांत संत्रा उत्पादकांचे उत्पन्न सरासरी १५० टक्क्यांनी घटले असल्याने प्रक्रिया उद्याेग उभारणे अत्यावश्यक आहे.

मागील पाच वर्षांत संत्रा उत्पादकांचे उत्पन्न सरासरी १५० टक्क्यांनी घटले असल्याने प्रक्रिया उद्याेग उभारणे अत्यावश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : मागील पाच वर्षांत कृषी निविष्ठांचे दर वाढल्याने नागपुरी संत्र्याचा प्रतिएकर उत्पादनखर्च सरासरी ९० टक्क्यांनी वाढला आहे. तुलनेत संत्र्यांचे उत्पादन व देशांतर्गत बाजारातील मागणी स्थिर असली तरी निर्यात घटल्याने दर काेसळले. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे उत्पन्न या पाच वर्षांत सरासरी १५० टक्क्यांनी घटले आहे. ही घडी नीट करण्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्याेग उभारणे आणि निर्यात वाढविणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रात एकूण दाेन हेक्टरवर संत्र्यांच्या बागा असून, यातील १ लाख ८० हजार हेक्टरवरील बागा एकट्या विदर्भात आहे. यात अमरावती व नागपूर व जिल्ह्यात संत्राबागांचे क्षेत्र सर्वाधिक असून, किमान एक लाख हेक्टरवरील बागा या उत्पादनक्षम आहेत. कृषी विभागाच्या मते विदर्भातील संत्र्यांचे उत्पादन सरासरी हेक्टरी सात टन एवढे आहे. संत्र्यांची उत्पादकता, प्रक्रिया उद्याेग आणि निर्यात वाढविण्यासाठी सरकारी पातळीवरून कुठलेही प्रभावी प्रयत्न करण्यात आले नाहीत व आजही केले जात नाहीत.

संत्र्यांचा उत्पादनखर्च काढताना केवळ कृषी निविष्ठांचे दर, मजुरी, वाहतूक व मशागतीचा इतर खर्च ग्राह्य धरला आहे. यातून शेतकऱ्याची मजुरी वगळली आहे. शेतकऱ्याची मजुरी प्रतिदिवस किमान ५०० रुपये विचारात घेतली तर संत्रा उत्पादनखर्च आणखी वाढणार असून, तुलनेत उत्पन्न घटणार आहे.

प्रतिएकर खर्च व उत्पन्न (सरासरी)

   वर्ष -        खर्च (रुपये/प्रतिएकर) - मिळालेला दर (रुपये/प्रतिटन)
१) २०१९-२० : ३०,००० - ३५,००० - ७५,००० रुपये फायदा
२) २०२०-२१ : ३७,७५० - १०,००० - ७,७५० रुपये नुकसान
३) २०२१-२२ : ४५,००० - २०,००० - १५,००० रुपये फायदा
४) २०२२-२३ : ५०,००० - १५,००० - ५,००० रुपये नुकसान
५) २०२३-२४ : ५५,००० - १४,००० - १३,००० रुपये नुकसान

किमान तीन लाख टन संत्रा निर्यात व्हावा

विदर्भात दरवर्षी सरासरी सात लाख टन संत्र्यांचे उत्पादन हाेते. यात अंबिया बहाराच्या संत्र्यांचे ६० टक्के म्हणजेच ४ लाख २० हजार टन आणि मृग बहाराच्या ४० टक्के म्हणजेच २ लाख ८० हजार टन संत्र्यांचा समावेश आहे. यातील ८० टक्के म्हणजेच सरासरी ५ लाख ६० हजार टन संत्रा हा ‘टेबल फ्रुट,’ तर १ लाख ४० हजार टन संत्रा हा प्रक्रियाक्षम असताे. देशांतर्गत बाजारातील संत्र्यांची मागणी विचारात घेत सरकारने दरवर्षी किमान तीन लाख टन संत्रा निर्यातीसाठी प्रयत्न करणे आणि निर्यातीत सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नवीन संत्रा आयातदार देश शाेधणे गरजेचे आहे.

पतंजली व ठाणाठुणी येथील प्रकल्प सुरू करा

सन २०२३-२४ च्या हंगामात नांदेडच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाने प्रतिदिवस सरासरी सहा हजार टन छाेट्या आकाराचा संत्रा खरेदी केला. त्यामुळे माेठ्या संत्र्याला सरासरी १४ हजार रुपये प्रतिटन दर मिळू शकला. हा प्रकल्प जर बंद असता, तर हेच दर प्रतिटन १० हजार रुपयांपेक्षा खाली गेले असते. संत्र्याच्या दराला उभारी देण्यासाठी नागपूर शहरातील पतंजली व ठाणाठुणी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प तातडीने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest News Average income of orange growers fell by 150 percent in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.