Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Baking Course : बंगलोर कृषी विज्ञान विद्यापीठात बेकरी प्रशिक्षण घ्यायची संधी, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Baking Course : बंगलोर कृषी विज्ञान विद्यापीठात बेकरी प्रशिक्षण घ्यायची संधी, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Latest news Baking Course Opportunity to take up bakery training at Bangalore University of Agricultural Sciences, read complete process | Baking Course : बंगलोर कृषी विज्ञान विद्यापीठात बेकरी प्रशिक्षण घ्यायची संधी, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Baking Course : बंगलोर कृषी विज्ञान विद्यापीठात बेकरी प्रशिक्षण घ्यायची संधी, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Baking Course : महाराष्ट्रातील ज्या युवकांना बेकरी व्यवसाय (Bakery Business) सुरु करावयाचा अशा तरुणांसाठी बेकरी प्रशिक्षण करण्याची संधी आहे.

Baking Course : महाराष्ट्रातील ज्या युवकांना बेकरी व्यवसाय (Bakery Business) सुरु करावयाचा अशा तरुणांसाठी बेकरी प्रशिक्षण करण्याची संधी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Baking Course : महाराष्ट्रातील ज्या युवकांना बेकरी व्यवसाय (Bakery Business) सुरु करावयाचा अशा तरुणांसाठी बेकरी प्रशिक्षण करण्याची संधी आहे. मात्र यासाठी तुम्हाला थेट बंगलोर विद्यापीठ गाठावे लागेल. मात्र अगदी अल्प दरात हे प्रशिक्षण मिळणार आहे. साधारण २५ दिवसांचा हा कोर्स असून अर्ज करण्यासाठी विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

कर्नाटक राज्याची (Karnataka) राजधानी असलेल्या बेंगळुरू या शहरातील कृषी विज्ञान विद्यापीठ (University of Agricultural Sciences Bengaluru) बैंगलोर बेकिंग टेक्नॉलॉजी आणि मूल्य संवर्धन विस्तार निदेशालय, जीकेविके या ठिकाणी हे प्रशिक्षण असणार आहे. चार आठवड्याचा हा कोर्स असून प्रशिक्षण किटसह अभ्यासक्रम शुल्क हे ३ हजार ४५५ रुपये असणार आहे.  यात बेकरी पदार्थ शिकणे, बेकरी उपकरणे/यंत्रसामग्री हाताळणे हे या प्रशिक्षण काळात शिकवले जाणार आहे. 

हे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण 
बटर बिस्किट, कोकोनट कुकीज, फ्रेश कोकोनट बिस्किट, मसाला बिस्किट, मेल्टिंग मोमेंट बिस्किट, नट रिंग्ज, पीनट कुकीज, व्हॅनिला बटण, बनाना केक, कोकोनट कॅसल, फ्रूट केक, ऑरेंज केक, स्पंज केक, सनशाइन केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, , जेल केक, बटर आयसिंग, ब्रेड रोल्स, मसाला डोनट, मिल्क ब्रेड, प्लेन ब्रेड, ब्राउन ब्रेड, पिझ्झा, पफ पेस्ट्री, डॅनिश पेस्ट्री, दिल पसंद, बॉम्बे खरा. 

प्रशिक्षण ठिकाण, तारीख आणि वेळ 

  • कृषी विज्ञान विद्यापीठ, बैंगलोर बेकिंग टेक्नॉलॉजी आणि मूल्य संवर्धन विस्तार निदेशालय, जीकेव्हीके, बेंगळुरू 
  • तारीख : 04 नोव्हेंबरपासून ते 29 नोव्हेंबरपर्यंत 
  • अभ्यासक्रमाची वेळ : सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत
  • प्रशिक्षण किटसह अभ्यासक्रम शुल्क : रु. ३,४५५ रुपये 
  • प्रशिक्षणा दरम्यान किचन ऍप्रन, डोक्यावर टोपी आणि मास्क अनिवार्य असणार आहे. 

 

अधिक माहितीसाठी संपर्क : 080-23513370 (संध्याकाळी 4.00 पूर्वी) 9740618692/9731164357/8971402077
दूरध्वनी क्रमांक : 080-23513370 तसेच विद्यापीठाच्या www.bakerytrainingunituasb.com या संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकता.. 

Web Title: Latest news Baking Course Opportunity to take up bakery training at Bangalore University of Agricultural Sciences, read complete process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.