Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती 

कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती 

Latest news Ethanol from Kadwa Sugar Factory distributed to Petroleum Company | कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती 

कादवा साखर कारखान्याचा इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित, कंपोस्ट खताचीही निर्मिती 

दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यातील इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यातील इथेनॉल पेट्रोलियम कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचे स्वप्न साकार होत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार कादवाने  3 लाख 50 हजार  लिटर इथेनॉल निर्मिती केली असून कादवाचे इथेनॉल पेट्रोलियम कंपनीकडे वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला वितरित झाला असून त्या टँकरचे पूजन चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी श्रीराम शेटे यांनी सांगितले की, केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे शक्य नसल्याने उप पदार्थ निर्मिती करणे अत्यावश्यक होते. कादवाने भविष्याचा वेध घेत इथेनॉल प्रकल्प हाती घेत सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे कारखान्याचा फायदा होत स्थैर्य लाभणार आहे. बायोगॅस प्रकल्प सुरू झाला असून त्यामुळे बगॅस बचत होणार आहे. कंपोस्ट खत निर्मिती झाली असून त्याचे वितरण सुरू झाले असून सभासदांना उधारीत खत वाटप केले जात आहे. ऊस नोंद व तोडणीचे योग्य नियोजन करण्यासाठी गावनिहाय ऊस उत्पादक यांची समिती गठीत करून ऊस तोडणीचे नियोजन करण्यात येईल असे सांगून जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. 

गाळप क्षमता वाढवण्याचा विचार

कादवाचे कार्यक्षेत्रात एकच वेळी ऊस लागवड होत असल्याने ऊस तोडीचे नियोजन विस्कळीत होत असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कादवाला 3500 गाळप क्षमतेचा परवाना मिळालेला असून कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असल्याने गाळप क्षमता करण्याचा विचार करावा लागेल, असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले. 

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…
 

Web Title: Latest news Ethanol from Kadwa Sugar Factory distributed to Petroleum Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.