Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > दूध अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर संपर्क साधावा, 'या' तारखेपर्यंत मुदत 

दूध अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर संपर्क साधावा, 'या' तारखेपर्यंत मुदत 

latest News Farmers to contact center for milk subsidy | दूध अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर संपर्क साधावा, 'या' तारखेपर्यंत मुदत 

दूध अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर संपर्क साधावा, 'या' तारखेपर्यंत मुदत 

संबधित केंद्रावर संपर्क साधून शेतकऱ्यांनी दूध अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

संबधित केंद्रावर संपर्क साधून शेतकऱ्यांनी दूध अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र शासनाने 5 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जाहिर केले आहे. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभाग संयुक्तरित्या या योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, शितकरण केंद्रे व फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आले असून प्राप्त अर्जाची छाननी करून प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉगीन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक विभागाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

शेतकऱ्यांनो हे कराल, तरच मिळेल दुध अनुदान

असे आहेत एकूण प्रकल्प 

नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात दहा सहकारी संघ असून एक मल्टीस्टेट 53 खाजगी दूध प्रकल्प असे एकूण 64 प्रकल्प आहेत. नाशिक जिल्ह्यात एक सहकारी संघ सात खाजगी दूध प्रकल्प असे एकूण आठ प्रकल्प आहेत. धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकूण तीन सहकारी संघ आहेत. जळगाव जिल्ह्यात एक सहकारी संघ आणि एक खाजगी दूध प्रकल्प असे दोन प्रकल्प कार्यरत आहेत. म्हणजेच 15 सहकारी संघ एक मल्टीस्टेट आणि 61 खाजगी दूध प्रकल्प असे एकूण 77 केंद्र नाशिक विभागात कार्यरत आहेत. या विभागात संपर्क साधून शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.


लाभ घेण्याचे आवाहन 

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत प्रकल्पांसमवेत संयुक्तरित्या बैठक घेवून योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना ईयरटॅग करण्याची कार्यवाही सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. तसेच या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी जनवारांचे ईयरटॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच दुध पुरवठा करत असणाऱ्या प्राथमिक सहकारी दुध संस्था, दुध संकलन केंद्र, शितकरण केंद्र यांच्याकडे आपला दैनदिन तसेच 10 दिवसाचा तपशिल देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक विभाग श्री. र. शिरपुरकर यांनी कळविले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…
 

Web Title: latest News Farmers to contact center for milk subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.