Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

latest news give information about milk collection to gram panchayat office | अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

अन्यथा 'त्या' दूध संकलन केंद्रावर कारवाई, नाशिक जिल्हा परिषदेचे महत्वपूर्ण पाऊल

दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता दूध संकलनाची माहिती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे देणे बंधनकारक आहे.

दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता दूध संकलनाची माहिती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे देणे बंधनकारक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : दूध भेसळ रोखण्यासाठी व दूध संकलन केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूध संकलनाची माहिती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब बैरागी यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देत तालुक्यातील दूध संकलन केंद्रांना त्यांच्याकडे देणाऱ्या व पुढे पाठवण्यात देणाऱ्या दुधाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाना देण्याच्या सूचना करण्याची मागणी केली होती. त्याआधी पांगरी येथील संकलन केंद्रांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दुधाची माहिती ग्रामपंचायतीस देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तहसीलदारांनीही ग्रामपंचायतींना सूचना करत संकलन केंद्राकडून माहिती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. 

 

त्यानुसार बैरागी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत संपूर्ण जिल्हाभरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेने तालुक्यातील सर्वच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवत आपापल्या क्षेत्रातील दूध संकलन केंद्रांना यावाचत सूचना करावयास सांगितले होते. त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने बैरागी यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले होते.

  
बैरागी यांच्या लढ्याला यश

दूध भेसळ रोखण्यासाठी वैरागी यांनी अनेकदा पांगरी येथे उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सुरुवातीला प्रशासनाने त्यांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती.
मात्र त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अनेकदा वासाठी निवेदनही दिले होती. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले असून आता जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेने दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडे न देणाऱ्यावर कारवाई करण्याचे सूचना केल्याने बैरागी यांचे उपक्रमाचे कौतुक होत आहे.


कारवाईच्या सूचना...

आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फडोळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायतीकडे न देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हाभरातील दूध संकलन केंद्रांना आपल्याकडे संकलन होणाऱ्या दूध व पुढे पाठवण्यात येणार दुधाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक झाले आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: latest news give information about milk collection to gram panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.