Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Goat Farm Care Tips : 'या' आठ उपायांनी हिवाळ्यात शेळ्या निरोगी राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farm Care Tips : 'या' आठ उपायांनी हिवाळ्यात शेळ्या निरोगी राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goat Farm Care Tips These eight remedies will keep goats healthy in winter, know in detail | Goat Farm Care Tips : 'या' आठ उपायांनी हिवाळ्यात शेळ्या निरोगी राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farm Care Tips : 'या' आठ उपायांनी हिवाळ्यात शेळ्या निरोगी राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farm Care Tips : थंडीच्या दिवसात शेळ्यांचे आरोग्याबाबत (Goat Farm winter Care Tips) विशेष काळजी घ्यावी लागते.

Goat Farm Care Tips : थंडीच्या दिवसात शेळ्यांचे आरोग्याबाबत (Goat Farm winter Care Tips) विशेष काळजी घ्यावी लागते.

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farm Care Tips : थंडीच्या दिवसात शेळ्यांचे आरोग्याबाबत (Goat Farm winter Care Tips) विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागते. हिवाळ्यात योग्य व्यवस्थापन  (Goat Farming) आणि काळजी घेतल्याने शेळ्यांचे आरोग्य चांगले राहतेच, शिवाय त्यांचे मांस व दूध उत्पादनही वाढते. आज या लेखातून शेळ्यांच्या संरक्षणासाठी काय काय करता ते पाहुयात... 

उबदार आणि सुरक्षित निवास
हिवाळ्यात शेळ्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांचे घर उबदार आणि सुरक्षित असावे. त्यांचे शेड हवेशीर ठेवा, थंड असल्यास ती बाजू व्यवस्थितरीत्या झाकून घ्या. शेळ्यांची जागा कोरडी आणि उबदार कशी राहील, याची काळजी घ्या. शक्यतो, सायंकाळच्या वेळी शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करा. तसेच शेळ्या जिथं बसतात, त्या जागेवर वैरण, भुसा पसरून ठेवा, जेणेकरून ती जागा उबदार होईल, ओलसर होणार नाही. 

पौष्टिक आहार
थंडीच्या दिवसांत शेळ्यांची ऊर्जेची गरज वाढते. सुका चारा, हिरवा चारा, धान्य यांचा आहारात असणे आवश्यक ठरते. जसे मका, बाजरी आणि सोयाबीन सारखे उच्च उर्जायुक्त पदार्थ खायला द्या. जेणेकरून शरीरात गरमपणा राहील. गूळ, धान्य किंवा इतर उर्जायुक्त खाद्य वापरा. हे त्यांना थंडीशी लढण्यास मदत करते.

कोमट पाण्याची व्यवस्था
वातावरण गारवा असल्याने पिण्याचे पाणीही थंड असते. थंड पाणी पिल्याने शेळ्या आजारी पडू शकतात. त्यांना कोमट पाणी द्या आणि ते पुरेसे पाणी पितील याची खात्री करा.

नियमित लसीकरण
हिवाळ्यात संसर्ग आणि रोगांचा धोका वाढतो. शेळ्यांना वेळेवर लसीकरण आणि परजीवी नियंत्रण उपचार देणे आवश्यक आहे.

काहीवेळ उन्हात असू द्या 
सकाळी किंवा दुपारी शेळ्यांना उन्हात जाऊ द्या. जेव्हा शेळ्यांना चारण्यासाठी नेत असाल तर अशावेळी उन्हात नेणे चांगले राहील. सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी त्यांच्या हाडे मजबूत करते आणि शरीर उबदार ठेवते.

कळपात राहू द्या 
चारताना किंवा बांधलेल्या असताना शेळ्यांना एकत्र असू द्या. कारण थंडीत गट तयार करून एकमेकांना उबदार ठेवण्याकडे शेळ्यांचा कल असतो. अधिक शेळ्या त्यांच्या राहण्याच्या जागेत एकत्र ठेवा, जेणेकरून ते एकमेकांना उबदारपणा देऊ शकतील.

स्वच्छतेची काळजी घ्या
हिवाळ्यात शेळ्यांचे शेड स्वच्छ व कोरडे ठेवणे गरजेचे आहे. घाण आणि ओलावा संसर्गाचा धोका वाढवतात, म्हणून नियमितपणे स्वच्छ करा.

रोगांवर लक्ष ठेवा
थंड हवामानात शेळ्यांमध्ये खोकला, न्यूमोनिया किंवा श्वसनाचे इतर आजार होण्याचा धोका वाढू शकतो. शेळ्यांच्या वर्तनाचे आणि आरोग्याचे निरीक्षण करा आणि काही विकृती आढळल्यास ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधा.

Goat Management : सुदृढ करडे मिळण्यासाठी गाभण शेळीची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Goat Farm Care Tips These eight remedies will keep goats healthy in winter, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.