Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Goat Sheep Care : जुलैमधील शेळ्या, मेंढ्याचे व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Goat Sheep Care : जुलैमधील शेळ्या, मेंढ्याचे व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Latest News How to care goats, sheep in rainy season in july Know in detail  | Goat Sheep Care : जुलैमधील शेळ्या, मेंढ्याचे व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Goat Sheep Care : जुलैमधील शेळ्या, मेंढ्याचे व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Goat, Sheep Care : पावसाळ्यात शेळ्या, मेंढ्याची आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते.

Goat, Sheep Care : पावसाळ्यात शेळ्या, मेंढ्याची आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते.

शेअर :

Join us
Join usNext

Animal Care In Rain : पावसाळ्यात (Rainy Season) जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. यात प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्याची (Goat Sheep) निगा राखणे महत्वाचे ठरते. जुलै महिन्यात नेमकी कशी काळजी घ्यावी हे पाहुयात..... 


जुलै व ऑगस्टमधील शेळ्यांतील व्यवस्थापन

शरीरावरील परजीवींच्या वाढीकडे लक्ष द्यावे.
नवीन करडांचे जंतनिर्मूलन करावे.
सर्व शेळ्यांचे आंत्रविषार, पी.पी. आर., धनुर्वातसाठी लसीकरण करून घ्यावे.
पैदासक्षम शेळ्यांना खुराक वाढवा.
पैदाशीच्या बोकडांची पैदाशीसाठी तयारी करावी. जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर माज ओळखण्यासाठी भाज ओळखणारा बोकड' (Teaser Buck) गोठ्यात ठेवावा.

जुलैमधील मेंढ्यांतील व्यवस्थापन

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कळपातील मेंढ्यांची लाल लघवीचा आजार व कावीळ या रोगाची तपासणी करून उपचार करावे
मेंढ्यांना शिफारशीनुसार जंताचे औषध उपचार करावेत.
गाभण मेंढ्याची विशेष काळजी घ्यावी
१ ते १२ महिने वयाच्या कोकरांचे शारीरिक वजन घ्यावे. सर्व मेळ्यांना धनुर्वात रोगाचे लसीकरण करून घ्यावे. 

इतर जनावरांसाठी काय काळजी घ्यावी 

गोठ्यामध्ये काही ठिकाणी पाणी गळत असेल तर वेळीच डागडुजी करावी. गोठ्यात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, जेणेकरून लघवी व शेणावाटे निघणारे अमोनियाए मिथेन वायूमुळे जनावरांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. वारा, थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई, म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते. दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावरांना जखमा होतात. यासाठी खुरांची नियमित तपासणी करावी. पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनांमुळे दुभत्या गाई, म्हशींच्या उत्पादनावर परिणाम होतो. हिरव्या चाऱ्याकरिता ज्वारी, बाजरी, मका, यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे. याचबरोबर बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत, मेथीघास यासारखी पिके घ्यावीत.


संकलन : ग्रामीण कृषी मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी

Web Title: Latest News How to care goats, sheep in rainy season in july Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.