Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > तांदूळ निर्यातबंदीमुळे इतर देशांची चिंता वाढली!

तांदूळ निर्यातबंदीमुळे इतर देशांची चिंता वाढली!

Latest news India ranks first in rice exports, exporting 23 MT of rice | तांदूळ निर्यातबंदीमुळे इतर देशांची चिंता वाढली!

तांदूळ निर्यातबंदीमुळे इतर देशांची चिंता वाढली!

अनेक देशांमध्ये तांदळाचा तुटवडा भासत असल्याने किमती देखील वाढल्याचे चित्र आहे. 

अनेक देशांमध्ये तांदळाचा तुटवडा भासत असल्याने किमती देखील वाढल्याचे चित्र आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

देशभरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यंदा पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे तांदळाचे उत्पादन घटले आहे. परिणामी केंद्र सरकारने यंदा जुलै महिन्यात बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे भारतीय तांदळावर निर्भर असलेल्या देशांची मात्र चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंद केल्याने अनेक देशांमध्ये तांदळाचा तुटवडा भासत असल्याने किमती देखील वाढल्याचे चित्र आहे. 
 
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपातील अनेक पिकांवर त्याचा परिणाम दिसून आला. यात भात पिकावर देखील मोठा परिणाम झाला. इतर वर्षांच्या तुलनेत भाताचे उत्पादन कमी झाले. त्यातच तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले. केंद्र सरकारने जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी आणली. वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. तांदळावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे. 

विशेष म्हणजे, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. जागतिक बाजारपेठेत 40 टक्के तांदूळ भारतातून जातो. यामध्ये एकट्या बासमती तांदळाचा वाटा लाखो टन आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये तांदळाचा मोठा तुटवडा असून यामुळे तांदळाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरगुती किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किंमतीवर परिणाम झाला. बांगलादेश, नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.

तांदूळ आयात करणारे देश चिंतेत 

भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतात. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात बंगालचा वाटा 13.62 टक्के आहे. तर प्रदेशमध्ये तांदळाचे उत्पादन हे 12.81 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा एकूण वाटा 9.96 टक्के आहे. मात्र यंदा पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातील तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये असमान पावसामुळे यावर्षी भाताच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. यंदा पुरेसा पाऊस न  झाल्याने तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे केंद्र सरकारने बिगर बासमती तांदूळ निर्यात बंदी केली. त्यामुळे तांदूळ आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. 

 

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest news India ranks first in rice exports, exporting 23 MT of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.