Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Latest news Milk Subsidy Relief to milk producers, now Rs 7 subsidy for cow's milk, read in detail  | Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Milk Subsidy : दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Milk Subsidy : दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Milk Subsidy : दूध उत्पादकांसाठी दिलासादायक (Milk Subsidy) निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान (Milk Farmers) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पाच रुपयांचे अनुदानाचा निर्णय (Maharashtra Government) काही महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. सदर दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रति करिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. 

त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी ९६५ कोटी २४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. 

Web Title: Latest news Milk Subsidy Relief to milk producers, now Rs 7 subsidy for cow's milk, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.