Poultry Farm Management : सध्या परतीचा पाऊस (Rain) अनेक भागात हजेरी लावत आहे. त्यातच दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर पावसाचे वातावरण होत आहे. अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या (Stress In Chicken) इतर रोगांना बळी पडू शकतात, अशावेळी काय उपाययोजना कराव्यात हे या लेखाद्वारे पाहूयात...
एका प्रकारच्या खाद्यापेक्षा वेगळे खाद्य देणे, घरगुती आहारात पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्व नसणे किंवा इतर कारणांमुळे ताण येऊन कोंबड्या पुरेसे खाद्य खात नसतील तर ताण येऊ शकतो. वजन वाढणे, पिसे गळणे किंवा वयात येणे यासारख्या घटना ताण निर्माण करू शकतात. कोंबड्यांना पकड़ताना, काही औषधे देताना किंवा एका जागेतून दुसरीकडे नेताना कोंबड्यांमध्ये भावनिक ताण येतो. रोग निवारणासाठी देण्यात येणाऱ्या औषधांमुळे व रोगाच्या अवधीमुळेही ताण येऊ शकतो.
अशा कराव्यात उपाययोजना
- कोंबड्यांमधील ताण घालविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रत्येक कोंबडीला किती जागा लागते, हे पाहून आपल्याजवळील उपलब्ध जागेनुसार एकूण कोंबड्यांची संख्या ठरवावी.
- छोट्या जागेत जास्त गर्दी केल्याने वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते. शिवाय पक्षीं एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने रोग आल्यास लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी.
- पावसाळ्यात व जास्त आर्द्रतेच्या काळात लिटर प्रयत्नपूर्वक कोरडे ठेवावे.
- वातावरणातील बदलांनुसार शेडमध्ये पडदे लावणे, पोती बांधणे या गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी.
- ताण घालविणारी औषधे तज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत. आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्त्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो.
- ताण असताना लसीकरण करू नये. प्रथम कोंबड्यांवरील ताण कमी करून मगच लसीकरण करावे.
- ग्रामीण मौसम कृषी सेवा केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी