Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > बी-बियाणांपासून ते अत्याधुनिक अवजारापर्यंत, रेणुका कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही! 

बी-बियाणांपासून ते अत्याधुनिक अवजारापर्यंत, रेणुका कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही! 

Latest News Renuka Agricultural Exhibition at Chandwad from today | बी-बियाणांपासून ते अत्याधुनिक अवजारापर्यंत, रेणुका कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही! 

बी-बियाणांपासून ते अत्याधुनिक अवजारापर्यंत, रेणुका कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही! 

Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik : नाशिक जिल्ह्याला कृषी क्षेत्राचा मोठा वारसा लाभला असून अलीकडच्या काळात अनेक उपक्रमशील शेतकरी नावारूपाला येत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेती जोपासली जात आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी कृषी प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहे. नाशिकनंतर आता जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बी बियाणांपासून ते शेतीच्या प्रत्येक अवजारापर्यंतची माहिती इथं मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 


आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चांदवडमध्ये प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे भव्य कृषि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दरम्यान चांदवड येथे आजपासून ते 4 डिसेंबरपर्यत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या या कृषी महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. चांदवड, देवळा, मनमाड, सटाणा, लासलगाव, निफाड, नांदगाव कळवणसह परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पॉलिहाऊस, नवनवीन बियाणे, नवीन यंत्रसामुग्री, महाराष्ट्र शासनान कृषी विभागाच्या विविध योजना, बँकिंगच्या विविध स्कीम, बचत गटातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतीपूरक नवीन उद्योजकांची,  माहिती, कांदा पीक, द्राक्ष पिक त्याचबरोबर मका या पिकांवरती तज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे या सर्व गोष्टींचे आयोजन या कृषी प्रदर्शनाद्वारे होणार आहे. 


हळूहळू शेतीत बदल होत असल्याने आधुनिकतेची कास धरून शेतकरी शेतीला पुढे घेऊन जात आहे. यात बी बियाणांपासून ते शेतीच्या प्रत्येक गोष्टीला आधुनिकेतचा साज चढवत त्याचा पुरेपूर वापर केला जात आहे. हल्ली कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे व्यासपीठ मिळू लागले आहे. कृषी प्रदर्शनातून वेगवगेळ्या अवजारांची माहिती, वेळेची, पैशांची बचत करणारे यंत्र, नवनवीन खते, बियाणे आदींची माहिती येथूनच मिळते. म्हणूनच हजारो शेतकरी कृषी प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे पाहायला मिळते. याच माध्यमातून चांदवड येथे प्रथमच रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 


कृषिप्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही!

दरम्यान या कृषी प्रदर्शनात खते, आधुनिक तंत्रज्ञान, औषधे, बी-बियाणे, अवजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विभाग, ऍक्वाकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा, डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसहायय, कृषी साहित्य, नियतकालिके असे अनेक स्टॉल असणार आहेत. शिवाय लाखो लोकांची रेलचेल व दररोज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा, द्राक्षे आणि मका या पिकांविषयी परिसंवाद व दुष्काळी भागांमध्ये पिकांसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत मार्गदर्शन 200  हुन अधिक कंपन्यांचा समावेश राहणार आहे. सदर प्रदर्शनाचे ठिकाण कृषि उत्पन्न बाजार समिती चांदवड, जि. नाशिक या ठिकाणी 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. 
 

Web Title: Latest News Renuka Agricultural Exhibition at Chandwad from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.