Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Livestock Care in Winter : How to take care of the health of livestock in winter read in detail | Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतलीतर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे. हिवाळा हा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे.

हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतलीतर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे. हिवाळा हा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतली तर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे. हिवाळा हा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे. मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा यांचा आहारात समावेश करून उत्पादकता वाढवता येते.

कशी घ्याल काळजी

  • हिवाळ्यातील गार वारे व थंडीमुळे जनावरांना फुफ्फुसदाह, श्वसनाचे विकार होतात. आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे. यासाठी जनावरांचा थंडीपासून बचाव करावा.
  • उबदारपणा राहण्यासाठी गोठ्यामध्ये जास्त शक्तीचे विद्युत दिवे लावावेत. गोठ्याच्या जाळीला पोते बांधावे. त्यामुळे गोठ्यामध्ये गार हवा येणार नाही.
  • जनावरांना दैनंदिन शारीरिक क्रिया व्यवस्थितपणे होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी पाजावे.
  • पावसाळ्यात वाढीस लागलेल्या जनावरांना पोषक वातावरण, हिरवा चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात ती धष्टपुष्ट होतात. या काळात जनावरांची क्षय, सांसर्गिक गर्भपातविषयक तपासणी करावी.
  • हिवाळ्यात जनावरे माजावर येतात का, याकडे लक्ष द्यावे. जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे याचे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात का, निरीक्षण दररोज करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन करावे. 
  • या काळात गोठा जास्त धुऊ नये, मलमुत्राचा निचरा तत्काळ करावा.
  • हिवाळ्यात जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीर उबदार ठेवावे लागते. याकरिता जनावरांच्या शरीरातून जास्त प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. यासाठी जनावराला जास्तीचा खुराक द्यावा लागतो. या ऊर्जेचा व्यय भरून काढण्यासाठी नेहमीच्या खुराकापेक्षा ५ ते १० टक्के जास्त प्रमाणात खुराक जनावराला द्यावा. यासोबतच योग्य मात्रेत खनिज क्षारांचा पुरवठा करावा. या काळात शिफारशीत मात्रेमध्ये मिठाचा वापर करणे उपयुक्त ठरते. याशिवाय उपलब्धतेनुसार योग्य प्रमाणात हिरवा चारा, बरसीम जनावरांना द्यावा.
  • बाह्य परजीवींपासून बचाव करण्यासाठी जनावरांना खरारा करावा. यामुळे शरीरावरील बाह्य परजीवी गळून पडतात. त्वचा चमकदार दिसते. गोठ्याच्या फटीत हे बाह्य परजीवी लपून बसतात. त्यामुळे गोठ्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिफारशीत गोचिडनाशकांची फवारणी करावी. या वेळी गोठ्यात जनावरे नसावीत.
  • पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्यामुळे झालेले पोटातील परजीवी कमी करण्यासाठी जंतनाशक औषधांची मात्रा जनावरांना हिवाळ्याच्या सुरवातीस द्यावी.
  • वासरांना हिवाळ्यात उबदार ठिकाणी ठेवावे. 

अधिक वाचा: Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड

Web Title: Livestock Care in Winter : How to take care of the health of livestock in winter read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.