Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

Lumpy Skin Disease: Lumpy skin disease has come again, worrying livestock farmers | Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत. एक जनावर दगावले आहे.

दीड वर्षापूर्वी आलेल्या लाटेत तब्बल १२८० जनावरे मृत्युमुखी पडल्याने 'लम्पी 'चा ताप गार्यांना आला असला तरी घाम मात्र पशुपालकांना फुटला आहे. गायवर्गीयगाय, बैल, वासराला 'लम्पी'ची लागण होते.

म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२२ पासून लम्पीची लागण झाली आणि वर्षभर शेतकऱ्यांचे गोठे मोकळे झाले.

वर्षभरात हातकणंगले, शिरोळ, करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल, पन्हाळा तालुक्यातील ५० हजारांपेक्षा अधिक जनावरांना त्याची लागण झाली, होती. शासन व 'गोकुळ'ने प्रतिबंधक लसीकरण केले, लसीकरण केले तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही झाला होता.

आता 'लम्पीने नव्याने डोके वर काढले असून शिरोळ तालुक्यातील दोन गावांत १७ जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला
आहे.

लसीकरण तरीही धोका
पशुसंवर्धन विभागाने दीड वर्षापूर्वी गायवर्गीय सर्व जनावरांचे लसीकरण केले. गोकुळ दूध संघाच्या मदतीने तब्बल २ लाख ८३ हजार ६३७ जनावरांना लस दिली, तरीही लम्पीचा धोका निर्माण झाला आहे.

लम्पीची लक्षणे
लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्राव, जास्त लाळ, पशूच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.

अशी मिळते आर्थिक मदत
३०,००० रु. - गाय
२५,००० रु. -  बैल
१६,००० रु. - वासरू

जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले आहे, पण शिरोळ तालुक्यात काही जनावरांना बाधा झालेली आहे. बाधित जनावराला चांगल्या जनावरापासून अलगीकरणात ठेवावे. प्राथमिक लक्षणे दिसताच स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार करून घ्यावेत. - डॉ. एम. ए. शेजाळ (प्रभारी पशुसंवर्धन उपायुक्त, कोल्हापूर)

Web Title: Lumpy Skin Disease: Lumpy skin disease has come again, worrying livestock farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.