Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Milk Prices: भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक; नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा

Milk Prices: भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक; नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा

Milk Prices: Milk producers aggressive due to falling prices; Movement in Nagar district | Milk Prices: भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक; नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा

Milk Prices: भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक; नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा

Milk Prices: भाव गडगडल्याने दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आपल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आंदोलन केले.

Milk Prices: भाव गडगडल्याने दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आपल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आंदोलन केले.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात दुधाचे (Milk prices) भाव ढासळल्याने शेतकरी संघटनेने दूध प्रश्नी हरेगाव फाटा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हात शेकडोंच्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवसेनेचे लखन भगत, संजय छलारे, वंदना मुरकुटे, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, प्रभाकर कांबळे, डॉ. दादासाहेब अधिक, डॉ. विकास नवले, डॉ. रोहित कुलकर्णी, भास्कर तुवर, गोविंद वाघ, शरद असणे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

ॲड. अजित काळे म्हणाले, शेतकऱ्याचे कुठलही पीक बाजारात आले की सरकार त्याचे भाव पाडते. आज दुधाला २२ रुपये भाव मिळत आहे. ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी तोच भाव ३८ रुपयांपर्यंत होता. त्यानंतर दोन वर्षांत दूध दर २२ रुपयांवर खाली आले. याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. त्यांनी जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान पाच टक्के शेतकऱ्यांच्या पुढे देखील कुणाला मिळाले नाही.

दररोज दोन कोटी लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाते आहे. त्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागेल आणि दुधाला ४० रुपये प्रतिलिटर दर द्यावाच लागेल. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना लुटण्याची भूमिका घेतली तर त्यानंतर भाजपा सरकारने त्यावर कडी करीत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर शेतकरी विरोधी महायुती सरकार असे अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दूध उत्पादक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची नैतिक जबाबदारी ही राज्यातल्या २८८ आमदारांची आहे. त्यांनी येत्या अधिवेशनात या प्रश्नांवर आवाज उठवावा, अन्यथा शेतकरी विधानसभा निवडणुकीत जागा दाखवतील, असा इशारा दिला. याप्रसंगी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: Milk Prices: Milk producers aggressive due to falling prices; Movement in Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.