Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

Milk Rate; increased milk rate how to decreased day by day | Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पोपटराव मुळीक
लासुर्णे : दूधव्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

खरेतर धोरणकर्त्यामुळेच दूध धंद्याची माती झाली आहे. अडचणींचा सामना करणान्या दूध व्यवसायाला उर्जितावस्था देण्याची सध्या गरज आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून दुधाचे दर ३७ रुपयांपासून २७ रुपयापर्यंत घसरले असल्याने शेतकऱ्यांना तब्बल आठ ते दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने तसेच बाजारामध्ये दूध जास्त झाल्याने दूध दर कमी होत असल्याचे सांगितले जाते. त्यात उन्हामुळे दूध उत्पादन घटले आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहेत. यामुळे दूध धंद्यावर कायमस्वरूपी उपाययोजना शासनाने अमलात आणावी शेतकऱ्यांमधून होत आहे.

महागाईमुळे दुधाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. हिरवा चारा यामध्ये कडवळ व मकवान याला एक गुंठ्यासाठी १७०० ते १८०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. तर काही शेतकरी चार ते पाच हजार रुपये प्रति गुंठा ऊस विकत घेतात.

सध्या जनावरांसाठी ही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने जनावरांमधील विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जनावरावरील वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांना लागणारे पशुखाद्याचे दर ही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

५० किलो पशुखाद्यासाठी चौदाशे ते साडे सतराशे रुपये शेतकऱ्याला मोजावे लागत आहेत. दूध दर वाढला अथवा कमी झाला तरी पशुखाद्याचे दर हे दिवसेंदिवस वाढतच राहतात शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

फक्त शेतकऱ्यालाच तोटा
-
दूध व्यवसायावर अनेक घटक अवलंबून आहेत यामध्ये प्रामुख्याने वाहतूकदार दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे ते विकणारे हॉटेल व्यावसायिक दूध संकलन करणारे पशुखाद्य निर्मिती व विक्री करणारे प्रक्रिया करणारे यासह अन्य घटक दूध व्यवसायावर अवलंबून आहेत.
प्रत्यक्षात दूध उत्पादकापेक्षा नफा हेच कमवतात. दुधाचे दर पडले की याचा थेट फटका फक्त शेतकऱ्यांनाच बसतो. गाई म्हशीच्या किमती घटकात तोटा सहन करावा लागतो म्हणजे व्यावसायिक तुपाशी तर शेतकरी उपाशी अशी दूध व्यवसायाची अवस्था झाली आहे.

वाढलेला दर दिवसेंदिवस असा कमी होत गेला
- जून २०२२- ३.५/८.५ या गुणवत्तेला ३३ रुपये प्रति लिटर दर मिळत होता.
सप्टेंबर २०२२ मध्ये ३५ रुपये प्रति लिटर झाला.
ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याच दुधाला ३६ रुपये दर मिळू लागला.
ऑक्टोबर २०२२ पासून नोव्हेंबर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकून राहिला.
एप्रिल २०२३ नंतर तोच दुधाचा दर दिवसेंदिवस एक रुपया दोन रुपये एक रुपया दोन रुपये कमी होत गेला, तोच दर २५ मे रोजी एक रुपया कमी होऊन तीन, पाच, आठ, पाच या गुणवत्तेच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर मिळू लागला असल्याने दूध धंद्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

अधिक वाचा: अधिक दुध उत्पादनासाठी गाभण जनावरांची काळजी कशी घ्याल?

Web Title: Milk Rate; increased milk rate how to decreased day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.