Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

Nashik district declared lumpy affected; Restrictions on buying and selling also | नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध

संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येऊन आंतर राज्य, आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

मंगळवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे साहाय्य घेण्यात यावे. तसेच परराज्यातून जे गोवर्गीय पशुधन आपल्या जिल्ह्यात येत असेल त्याच्या तपासणीसाठी आंतर राज्यमार्गावर तपासणी नाका सुरू करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लम्पीच्या या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यातील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधित लसीकरणाचे नियोजनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संबंधित मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

Web Title: Nashik district declared lumpy affected; Restrictions on buying and selling also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.