Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल

दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल

New GR comes for milk subsidy; There has been a change in the purchase price | दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल

दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने खरेदी दराचा निर्णय बदलला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने खरेदी दराचा निर्णय बदलला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने खरेदी दराचा निर्णय बदलला आहे. त्यानुसार आता २७ रुपये प्रतिलिटर खरेदी दर २५ रुपयांवर आणण्यात आला आहे.

मात्र, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोन रुपयांचा तोटा होईल. ही बाब घातक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे ज्या सहकारी व खासगी दूध संस्था २५ रुपये लिटर दराने दूध खरेदी करीत असतील, अशा शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

राज्यात आतापर्यंत केवळ ५१ हजार ५०० शेतकऱ्यांना ५ कोटी ४४ लाखांचे अनुदान वाटण्यात आले आहे. या निर्णयामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, असा राज्य सरकारचा अंदाज आहे.

राज्य सरकारने जानेवारीमध्ये राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ, तसेच प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दूध संघ व प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या प्रतीसाठी किमान २७ रुपये प्रतिलिटर दर देणे अपेक्षित होते.

अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ५ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक दूध संघ तसेच प्रकल्प २७ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करत नव्हते. बाजारातील दराच्या चढ-उतारामुळे या संघ व प्रकल्पांना दूध खरेदी तोट्याची होत होती.

परिणामी २७ रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी होत असल्याने अनुदानाचा लाभ देता येत नव्हता. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दूध संघ व प्रकल्पांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

अनुदानाची योजना जाहीर झाल्यापासून आजवर राज्यात ५१ हजार ६०० शेतकऱ्यांना ५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. या आकड्यांवरून ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच राज्य सरकारने याची कक्षा वाढविण्यासाठी दूध खरेदी दर कमी करण्याचे ठरविले आहे. - प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्ध व्यवसाय

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोन रुपयांचा तोटा होईल. राज्य सरकारने दुधाला किमान दर ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अनुदानाच्या माध्यमातून हा दर ३० रुपयांवर आणण्यात आला. ही बाब घातक आहे. - अजित नवले, शेतकरी प्रतिनिधी

दूध संघ व संस्थांनीदेखील शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. - प्रकाश कुतवळ, कुतवळ डेअरी

Web Title: New GR comes for milk subsidy; There has been a change in the purchase price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.