नैसर्गिक गूळ खात असताना तो दिसायला देखणा नसला तरी तो बहुगुणी शक्ती आहे. तो काळसर पिवळसर रंग ओठाला व जिभेला चिकटतो. त्याचा मंद स्वाद दीर्घकाळ राहतो. त्यामुळे या गुळापासून शरीराला आवश्यक ऊर्जा, स्फूर्ती व खनिजसाठा यांचा पुरवठा मात्र निश्चित केला जातो.
या गुळात कोणत्याही प्रकारचे रसायन वापरलेले नसते. त्याला निसर्गाचाच अत्युच्च प्रतीचा टिकाऊपणा मिळालेला असतो. त्यामुळे हा गूळ जसजसा जुना होत जातो तसतसा त्यामध्ये औषधी गुणधर्मही वाढत जातो. असा जुना गूळ काविळीसारख्या रोगावर अतिशय गुणकारी ठरू शकतो.
आरोग्यासाठी सेंद्रिय गूळ
• कोणत्याही प्रकारचे रासायनिक दव्य न वापरता वाढवलेल्या उसापासून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेला गूळ मानवी आरोग्यासाठी निश्चितपणे बहुगुणी संजीवनी ठरत असल्याचे वैद्यकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
• देशी गायीचे शेण, तूप, मध याचे दावण, शेणखत व योग्य पाण्याचे नियोजन या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेला ऊस शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन ठरते.
• अशा सेंद्रिय उसापासून त्याच नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला गूळ मानवी शरीराला शक्त्ती व खनिजांचा साठा उपलब्ध करून देतो.
• सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याने अॅनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी अॅनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गूळ खाणे फायदेशीर असते.
• सेंद्रिय गूळ खाण्यामुळे रक्तदाब योग्य ठेवण्यास मदत होते. गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
सेंद्रिय गूळ अनेक रोगांवर औषधी
ऊस उत्पादनापासून ते गूळ निर्मितीपर्यंत नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यास त्या गुळापासून शरीराला कार्बोहायड्रेट स्वरूपातील शक्ती पुरविण्याचे काम करते. तर नैसर्गिक गुळामुळे ग्लुकोज व फ्रुक्टोजचे प्रमाण संतुलित राहते.
नैसर्गिक गुळाचे हे आहेत फायदे
• नैसर्गिक गूळ अन्न पचनासाठी उपयुक्त ठरत असल्याने भारतात जेवणानंतर गूळ खाण्याची पद्धत आहे.
• घशातील खवखव व सततचा खोकला कमी करण्यासाठी या नैसर्गिक गुळाचे सेवन केले जाते.
• घशातून आवाज व्यवस्थित येण्यासाठीही गुळाचा खडा खाण्याची पद्धत आहे.
• नैसर्गिक गुळातून लोह व कॅल्शियमसारखे शरीर उपयोगी घटक मोठ्या प्रमाणात मिळतात.
• नैसर्गिक गूळ हा स्फूर्ती व शक्तीचे भांडार असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पुरातन काळापासून हिंदू धर्म शास्त्रात धार्मिक कार्यात गुळाचा वापर करतात.
• मुस्लीम धर्मातही दूध व गुळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले.
सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज, व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने अॅनिमिया किया पांडुरोग होत असतो.