Join us

ड्रॅगन कोंबडी लाखांत एक! या कोंबडीत असं काय विशेष आहे?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: January 28, 2024 14:38 IST

तपकीरी पायाच्या आणि भक्कम वजनाच्या डाँग ताओ चिकन लोकप्रीय.. ड्रॅगन कोंबडीची जगभरात या कोंबडीची मागणी वाढती आहे.

भारतात 'चिकन'चे अनेक शौकीन. एवढ्या प्रकारचे चिकनचे प्रकार आहेत की त्याच्या चवीप्रमाणेच त्या ठिकाणाहून ते प्रसिद्ध आहेत. शिवाय त्याच्या जातीवरून त्याच्या किमतीही ठरलेल्या आहेत. पण तुम्ही कधी एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचं चिकन पहिलंय किंवा खाल्लंय का?

तुम्ही म्हणाल असं कुठल्या कोंबडीचं चिकन लाखभर रुपयाचं आहे! पण हे खरंय. व्हिएतनाम देशात सापडलेल्या एका कोंबडीची किंमत लाखोंमध्ये आहे. या कोंबडीच्या जातीचं नाव डोंग ताओ असं आहे. ज्याला ड्रॅगन चिकनही म्हटलं जातं. या कोंबडीला विकत घ्यायचं असेल तर त्या किमतीत आपल्याकडच्या सगळ्यात महाग कडकनाथ चिकनच्या २०० कोंबड्या खरेदी करता येईल एवढी या ड्रॅगन कोंबडीची किंमत आहे. 

जगातल्या सर्वात महागड्या कोंबड्यांमध्ये ही कोंबडी आता गणली जाऊ लागली आहे. व्हिएतनाममध्ये जरी सापडली असली तरी याच्या वाढत्या मागणीमुळे जगभरातल्या पोल्ट्री व्यवसायिकांनी या कोंबडीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

काय वेगळंय या कोंबडीत?

डॉन्ग टाओ या ड्रॅगन कोंबडीचं पालन व्हिएतनाम देशात आधी सुरु झालं. शेताच्या एका भागात या जातीच्या काही कोंबड्या पाळल्या. या कोंबड्यांचे पाय ही सामान्य कोंबड्यांपेक्षा वेगळे आहेत काहीसा मोठा आकार आणि दिसायला तपकीरी विटेसारखे. याच खास गुणधर्मामुळे जगभरात या ड्रॅगन कोंबडीला प्रचंड मागणी असते. परदेशात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या कोंबडीचं चिकन जगात सर्वात महाग आहे.

मेदाची मात्रा कमी

या कोंबडीत असलेली मेदाची मात्रा कमी असल्याने ड्रॅगन कोंबडीला खाणं लोक पसंत करत आहेत. यासोबतच या कोंबडीचं वजन इतर कोंबड्याच्या तुलनेत अधिक आहे. साधारण १० किलोया या चिकनमध्ये फॅटही कमी असल्याने याला मागणी वाढती आहे.

स्वादिष्ट चव

ड्रॅगन कोंबडीची चवीला स्वादिष्ट असल्याने या कोंबडीला असणारी मागणी अधिक आहे. प्रोटीनने भरपूर असणारे याचे चिकन तरुणांमध्ये लोकप्रीय होत आहे.

टॅग्स :व्यवसायअन्नविएतनाम