Poultry Farming : आपण दररोज खातो त्या अंड्यातून पिल्लू जन्माला येते का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक अंड्यातून जीव जन्माला येत नाही. आपण लेयर, गावरान किंवा क्रॉस ब्रीडचे अंडे खातो. पण आपण अंडे खात असताना त्यातून जीव जन्माला येतो की नाही याचा विचार कधीच करत नाही.
तसं पाहिलं तर आपण दोन प्रकारचे अंडे खातो. एका प्रकारच्या अंड्यातून जीव जन्माला येत नाही. तर दुसऱ्या प्रकारच्या अंड्यातून जीव जन्माला येतो. पण जीव जन्माला येणाऱ्या अंड्याच्या उत्पादनाची पद्धतही वेगळी असते.
पशुसंवर्धन विभागाच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कावेरी जातीच्या कोंबड्यामध्ये अंडी देण्याची क्षमता असते. त्यासाठी प्रजनन करण्याची गरज नसते किंवा नर कोंबड्याचीही गरज नसते. नर कोंबड्याविना दिलेल्या अंड्यातून पिल्लू जन्माला येत नाही. ते फक्त खाण्यासाठीच वापरले जाऊ शकते. तर ज्या कोंबड्या नर कोंबड्यापासून प्रजनन होऊन अंड्याचे उत्पादन करतात अशाच अंड्यातून पिल्लू जन्माला येते.
अंडे शाकाहारी की मांसाहारी?वैज्ञानिकदृष्ट्या एका प्रकारच्या अंड्यातून जीव जन्माला येतो तर दुसऱ्या प्रकारच्या अंड्यातून जीव जन्माला येत नाही. त्यामुळे ज्या अंड्यातून जीव जन्माला येत नाही अशा अंड्याला शाकाहारी म्हणू शकतो. पण हे अंडे डोळ्याने ओळखता येत नाही त्यामुळे अंडे शाकाहारी की मांसाहारी या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकानुसार सोयीनुसार वेगवेगळे असू शकते.