Join us

कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी शेडमध्ये करा ह्या सोप्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:18 IST

Poultry Care in Summer वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कूटपालनावर झालेला आढळून येतो. ऋतूंचा विचार केला असता, उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो.

वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कूटपालनावर झालेला आढळून येतो. ऋतूंचा विचार केला असता, उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो.

त्यामुळे प्रत्यक्षपणे मांसल व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात घट होते. ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान ३८ ते ४० अंश से. पर्यंत पोचते. त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो.कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी उपाय◼️ कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे आच्छादीत भिंत व छताच्या शेडमध्ये ठेवावे.◼️ त्याचप्रमाणे शेडमध्ये हवा खेळती राहील अशा ठिकाणी व दिशेस शेडची बांधणी करावी.◼️ छताच्या पुढच्या बाजूला २४ इंच एवढ्या लांबीचे आच्छादन बसवावे.◼️ उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करावी व त्यास पांढऱ्या रंगाने रंगविणे फायदेशीर ठरते, तसेच छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, भाताचा कोंडा टाकावा व त्यास ओले ठेवावे.◼️ दिवसातून तीन-चार वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी. असे केले असता शेडमधील तापमान कमी होऊन कोंबड्यांना थंडावा मिळतो.◼️ शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे, जेणेकरून शेडमध्ये थंडपणा राहील व कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविता येईल.◼️ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेडमध्ये ताजी हवा खेळती ठेवणे फार महत्त्वाचे आहे.◼️ हवा खेळती न राहील्यामुळे शिळी व दूषित हवा पक्ष्यांच्या शेडमध्ये तयार होते व त्या हवेत अमोनिया, ओलसर कार्बन डाय-ऑक्साईड व धुळीचा शिरकाव होतो व कोंबड्यांवर ताण येऊ शकतो.◼️ नैसर्गिक हवा शेडमध्ये खेळती ठेवण्यासाठी पंख्यांचा वापर करावा, जेणेकरून शेडमधील हवेची हालचाल वाढेल व आत असलेली अधिक उष्णता बाहेर टाकली जाईल.◼️ त्याचप्रमाणे शेडमध्ये तयार झालेली शिळी हवा बाहेर घालविण्यासाठी बाहेर हवा फेकणाऱ्या पंख्यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल.◼️ उष्माघातावर मात करण्यासाठी आहारातील समतोल राखणे गरजेचे आहे.◼️ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्या खाद्यांमध्ये अचानकपणे बदल करू नये.◼️ उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना खात्रीशीर, स्वच्छ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याकरीता शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ३५-५० टक्यांनी वाढवावी.◼️ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्याच्या जास्त हालचालींमुळे त्यांच्या शारीरिक उष्णतेत वाढ होऊन, त्यांच्यावर उष्णतेचा ताण येऊ शकतो.◼️ हे टाळण्यासाठी कुक्कूटपालकाने व तेथील कामगाराने जास्त वेळा शेडमध्ये जाणे टाळावे. शेडमध्ये पक्ष्यांची अधिक गर्दी असेल, तर पक्ष्यांची घनता कमी करावी.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :पोल्ट्रीतापमानपाणीव्यवसायशेतकरी