डॉ. बाबासाहेब अबिडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तळेगाव दाभाडे, पुणे येथे मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायासाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण, निवास व भोजन इ. चा खर्च बार्टी, पुणे मार्फत केला जाणार आहे.
अ. क्र. | प्रशिक्षण कार्यक्रम | कालावधी | एकूण प्रशिक्षणार्थी संख्या |
१ | कुक्कुटपालन | ३ दिवस | ३० |
२ | रेशीम उद्योग | ३ दिवस | ३० |
३ | मधुमक्षिका पालन | ३ दिवस | ३० |
४ | रोपवाटिका व्यवस्थापन | ३ दिवस | ३० |
५ | शेडनेटहाऊस तंत्रज्ञान | ५ दिवस | ७५ |
पात्रता निकष- केवळ अनुसूचित जातीचा विद्यार्थी असावा- वयोमर्यादा १८ ते ३५ वर्ष- महाराष्ट्रातील रहिवासी- किमान ८ वी पास
कागदपत्रे यादी खालीलप्रमाणे- शैक्षणिक प्रमाणपत्र (MARKSHEET)- जातीचा दाखला (CASTE CERTIFICATE)- आधार कार्ड- शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (TC/LC)- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र*सदर प्रशिक्षणसाठी आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत स्वःत प्रमाणित केलेली असावी.
वेळापत्रक- अर्ज सुरु होण्याची तारीख : १५ सप्टेंबर २०२३- नोंदणीची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२३- कागदपत्रांची पडताळणीची तारीख : ५ ऑक्टोबर २०२३- अंतिम यादी प्रदर्शित करण्याची तारीख : ७ ऑक्टोबर- २०२३ बॅच सुरू होण्याची तारीख : १ ऑक्टोबर २०२३
प्रशिक्षणाचे इतर फायदे- अनुभवी पात्र प्रशिक्षक- प्रॅक्टिकल ट्रेनिंग निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन- प्रशिक्षण प्रमाणपत्र
प्रशिक्षण संस्थेशी संपर्कासाठी पत्ताराष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थासर्वे नं. ३९८-४००, सी.आर.पी.एफ कॅम्पसजवळ, जुना पुणे- मुंबई हायवे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जी. पुणे-४१०५०६, महाराष्ट्र
संपर्क०२११४-२५५४८०/२५५४८१९४२३०८५८९४/९४२३२०५४१९
वेबसाईटwww.nipht.orgई-मेल: htc_td@yahoo.co.in