Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते?

Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते?

How is goat farming done in Israel? | Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते?

Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते?

शेळी हा प्राणी मुख्यतः दुध, मटण आणि लोकर या करिता सर्वत्र परिचित आहे. इस्राईलमध्ये सुद्धा खूप पूर्वीपासून शेळीपालन केले जात आहे येथील विशेष बाब म्हणजे ज्या पशुपालकाकडे वा शेतकऱ्याकडे शेळी अथवा मेंढी यांचा मोठा कळप आहे त्यांना समाजात आर्थिकदृष्ट्या प्रबळ व धनवान समजले जायचे.

शेळी हा प्राणी मुख्यतः दुध, मटण आणि लोकर या करिता सर्वत्र परिचित आहे. इस्राईलमध्ये सुद्धा खूप पूर्वीपासून शेळीपालन केले जात आहे येथील विशेष बाब म्हणजे ज्या पशुपालकाकडे वा शेतकऱ्याकडे शेळी अथवा मेंढी यांचा मोठा कळप आहे त्यांना समाजात आर्थिकदृष्ट्या प्रबळ व धनवान समजले जायचे.

शेअर :

Join us
Join usNext

बायबलच्या काळापासून भटकंतीत शेळी मानवाशी निगडीत आहे. शेळी हा प्राणी मुख्यतः दुध, मटण आणि लोकर या करिता सर्वत्र परिचित आहे. इस्राईलमध्ये सुद्धा खूप पूर्वीपासून शेळीपालन केले जात आहे.

येथील विशेष बाब म्हणजे ज्या पशुपालकाकडे वा शेतकऱ्याकडे शेळी अथवा मेंढी यांचा मोठा कळप आहे त्यांना समाजात आर्थिकदृष्ट्या प्रबळ व धनवान समजले जायचे, इस्राईलमध्ये आजही शेळी व मेंढी पालन केले जाते यात दुग्धयुक्त प्रक्रिया याकडे विशेष लक्ष दिले जाते.

आजच्या घडीला पाहिलं तर इस्राईलला शेळीपालनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते आहे येथील शेळीपालनाच्या यशाचं गमक म्हणजे दुधावर प्रक्रिया आणि दुध व प्रक्रिया युक्त पदार्थ यांची गुणवत्ता यांना विपणननाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे यात गुणवत्तेस विशेष प्राधान्य आहे.

तंत्रज्ञान विकास आणि त्याचा वापर बाजारपेठेतील मागणी व पुरवठा या दोहांमध्ये इस्राईल जगातील सर्व देशांसाठी एक जागतिक स्पर्धक आहे. बरेच पशुपालक शेतकरी शेळी व मेंढी यांच्या दुधावर स्वता: कडेच प्रक्रिया करतात. इस्राईल मधील शेळी पालन आणि कृषी पर्यटन यांची उत्तम सांगड आहे.

शेळीपालनासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात देशाच्या उत्तर भागगतील शेतकरी व्यापक शेती पद्धतीचा अवलंब करतात यात शेळ्यांचा मोठा कळप असतो आणि त्याचे संगोपन पारंपारिक पद्धतीने केले जाते त्यामध्ये यांत्रिकीकरण वा आधुनिक तंत्र याचा इतकासा समावेश नसतो अशाप्रकारे शेळ्यांचे संगोपन केले जाते.

शेळी पालनाची दुसरी पद्धत बंदिस्त शेळीपालन यात शास्त्रशुद्ध पद्धतीने शेळ्यांचे संगोपन केले जाते आहारातील प्रत्येक घटकावर विशेष भर देऊन आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरणाचा वापर या पद्धतीने शेळ्यांचे संगोपन केले जात आहे.

शेळीपालनाची तिसरी आणि वरील दोन्ही पद्धतीचा सुवर्णमध्य असणारी पद्धत म्हणजे अर्धबंदिस्त शेळीपालन यात दोन्ही पद्धतीतले तंत्र वापरले जाते शेळ्यांचे संगोपन केले जाते. तंत्रज्ञानाच्या अफलातून प्रगतीमुळे शेळी पालकांच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे.

बंदिस्त शेळीपालन पाहिलं तर त्यात दुध काढण्यासाठी अद्यावत प्रणालीचा वापर आणि सर्व शेळ्यांची इत्यंभूत माहिती संगणक प्रणालीचा वापर करून भविष्यातील वापरासाठी संचयित केली जाते याचा फायदा शेळ्यांचे व्यवस्थापन व बाजारपेठ यासाठी होतो.

संतुलित आहार ( Total Mixed Ratio/TMR ) याची निर्मिती व पुरवठा मोठमोठ्या खाद्य निर्मिती केंद्रावरून दररोज शेतकऱ्यांच्या बंदिस्त शेळीपालन करणाऱ्या गोठ्यावर केला जातो. शेळीपालन हा इस्राईलमधील अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्चतम गुणवत्तेचा अबाधित ठेवेलेला व्यवसाय आहे.

शेतकऱ्यांनी स्वच्छ व गुणवत्तापूर्ण आणि दुध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी इस्राईल कृषी मंत्रालयाकडून संशोधन आणि विकास विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. इस्राईली दुग्ध महामंडळाने शेळीच्या दुधासाठी दुधातील घटक यात फॅट आणि प्रथिने किती असावीत हे निर्धारित केले आहे.

आज पाहिलं तर शेतकऱ्यांचा कल पारंपारिब्य पद्धतीकडून सेंद्रिय शेती व कृषी पर्यटन क्षेत्राकडे वाढताना दिसतो आहे. इस्राईल मधील दुग्ध शाळेत शेळी व मेंढी पालनाविषयी अत्याधुनिक व व्यापक प्रकारे मार्गदर्शन केले जाते.

यात प्रामुख्याने त्यांचा आहार, आरोग्य, पशुवैद्यकीय चिकित्सा, प्रजनन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, विपणन, तंत्रज्ञान प्रसिद्धी या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे. दुग्ध शाळेच्या तज्ञ सल्लागार यांचेकडून परिसंवाद, व्यावसायिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष गोठ्यातील कामाचा अनुभव आणि गोठ्यांस क्षेत्र भेट याद्वारे मार्गदर्शन केले जाते.

आज आपल्याकडे ही शेतकरी शेळीपालन व्यावसायिक दृष्टीकोनातून करतो आहे याला उत्तम तंत्रज्ञान आणि चोख नियोजन तसेच दुधप्रक्रिया, विपणन यात अत्याधुनिकता आणली तर आपणही शेती आधारित शेळीपालन यशस्वी करू.

लँगर ओफियर
व्यवस्थापकीय संचालक, द इस्राईली दुग्ध शाळा

Web Title: How is goat farming done in Israel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.