कोंबडी थंड वातावरणात आपले तापमान ७३ अंश फॅ. इतके कमी होईपर्यंत तग धरू शकते; पण उष्णतेच्या बाबतीत फक्त १० अंश फॅ पर्यंतच (११३ ते ११७) वाढ सहन करते.
शीघ्रतेने ही उष्णता कमी झाली नाही, तर पक्ष्यांच्या मरतुकीत होते. शरीरातून उष्म्याचे उत्सर्जन मुख्यत्वे कातडीवर येणाऱ्या घामामुळे आणि श्वसन क्रियेद्वारे केले जाते.
कोंबडीमध्ये घामाच्या ग्रंथी नसल्याने उष्णतेचे उत्सर्जन हे मुख्यत्वे श्वसनातून केले जाते. आत येणारी थंड हवा, फुफ्फुसाला जोडून असणाऱ्या विशिष्ट हवेच्या पिशव्या शरीरात आतपर्यंत घेऊन जातात आणि आतील उष्मा बाहेर काढतात.
कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखावे?
१) कोंबड्यांना जर उष्णतेचा त्रास जाणवत असेल, तर त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्यामध्ये मंदपणा व सुस्तपणा दिसून येतो.
२) काही कोंबड्या या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या असतात.
३) तसेच काही कोंबड्या या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या असतात.
४) उन्हाळ्यात जर कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास जाणवत असेल, तर त्या जास्त पाणी पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात.
५) कोंबड्या शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी व थंडपणा आणण्यासाठी त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात.
६) उष्णतेला कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकताना शेडमध्ये दिसून येतात.
७) काही कोंबड्या श्वास घेण्यास धडपडू लागतात व त्यांना दम लागतो.
८) काही कोंबड्यांचे उष्माघातामुळे पाय लटपटतात आणि ठराविक काळासाठी त्या चक्कर येऊन खाली पडतात, त्यांची त्वचा रखरखीत होते व रंगामध्ये फरक दिसून येतो.
९) कोणत्याही प्रकारचे कारण नसताना, कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या व अंडी उबविण्याच्या क्षमतेतसुद्धा कमीपणा आलेला दिसून येतो.
१०) कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार हा लहान होतो व त्यांच्या अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येते.
११) मांसल कोंबड्यांमध्ये उष्माघातामुळे वाढीचा दर कमी होतो व त्या अधिक प्रमाणात उष्माघातामुळे मृत्युमुखी पडतात.
अधिक वाचा: प्रत्येक गोठ्यात पशुप्रथमोपचार पेटी का असावी? व त्यात काय असावे? वाचा सविस्तर