भारतामध्ये आज पोल्ट्री/कुक्कुटपालन व्यवसाय एक जलद वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा कुक्कुटपालन क्षेत्राचा विकास जास्त आहे. तसेच अलीकडच्या काळात लोकांच्या आहारात बदल होऊन मांसाचा समावेश वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यावसायिक कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये गावरान सजल्या जाणाऱ्या रंगीत पक्षांना व त्यांच्यापासून मिळणाऱ्या खाकी रंगाच्या अंड्यांना विशेष महत्त्व आहे.
परंतु यांच्या कमतरतेमुळे आणि यांच्या कमी संख्येमुळे बाजारातील उपलब्धता कमी आहे तसेच त्यांच्या त्यांचा भावही जास्त आहे. म्हणून सर्वसामान्य ग्रामीण भागातील कुटुंबांना याची उणीव भासते. याच अनुषंगाने, कुक्कुटपालन संशोधन संचलनालय, हैदराबाद या संस्थानाकडून विविध सुधारित जाती तयार करण्यात आल्या आहेत. या जाती आपल्या संमिश्रित ग्रामीण कोंबड्यांपेक्षा जास्त उत्पन्न देतात. तसेच त्यांची जोपासना केल्यास अधिकचे उत्पन्न सुद्धा मिळते. यामध्ये प्रामुख्याने गिरीराज, ग्रामप्रिया, श्रीनिधी, वनराज, घागस, कृषीब्रो सारख्या जाती प्रचलित आहेत.
ग्रामप्रिया पक्षांची वैशिष्ट्ये
- वजन वाढ झपाट्याने होते.
- अंडी देण्याचे वय कमी असते.
- पक्षांच्या रंग खाकी-तपकरी सारखा असतो.
- वर्षाला १७० ते १८० अंडी देण्याचे प्रमाण.
- रोगप्रतिकारशक्ती स्थानिक कुक्कुटपक्षांप्रमाणेच.
- खाद्य व दाणे टिपून खातात म्हणून खाद्यावरचा खर्च कमी होतो.