हिवाळ्यात पशुआहार फार महत्वाचा असतो. अशावेळी शेतकऱ्यांनी जनावरांना भरपेट पशु आहार देणे आवश्यक असते. संतुलित आहार असल्यास जनावरांना हिवाळ्यात फायदेशीर ठरते. तसेच थंडीचा काळ असल्याने आहारापासून पशूंना उब मिळत असते. ऊब देखील मिळत असते. त्यामुळे सर्वच पशु पालकांनी याबाबत सजग असणे आवश्यक असते.
हिवाळा सुरु झाल्यानंतर वातावरणात अनेक बदल होत असतात. जसे माणसाला हिवाळ्यात काळजी घेणे गरजेचे असते, जेणेकरून अनेक आजारांपासून बचाव करता येईल तसेच पशु पशुपक्षांना देखील थंडीपासून बचावासाठी काळजी घेणे महत्वाचे असते. जसं पशु पक्ष्यांचं घर उबदार ठेवणे आवश्यक असते. तसेच आहाराबाबतही देखील काळजी घ्यावी लागते. थंडीच्या काळात जनावरांना संतुलित आहार देणं अपेक्षित असते. ज्यामध्ये जनावरांना पोषक घटक असणे गरजेचे ठरते. ज्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांची प्रतिकार शक्ती वाढीस लागेल. यामुळे थंड हवामानाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही.
काय काय पशु आहार द्यावा...
गाईचं घ्याल तर साधारण एक लिटर दुधासाठी चारशे ते पाचशे ग्रॅम खुराक दिला जाऊ शकतो. जर दहा लिटर दूध मिळत असेल तर चार ते पाच किलो खुराक देणे आवश्यक ठरते. आणि दीड किलोचा अतिरिक्त खुराक द्यावा लागतो. तसेच पोल्ट्रीच्या फिडमध्ये देखील काळजी घ्यावी लागते. जे स्टार्टर फीड किंवा प्रोटेनिअस फीड आहे, हे फीड वाढवून आपण उबदारपणा वाढवू शकतो. त्याचबरोबर आहारात मिठाचा वापर करावा, जर देत असलेले पाणी गरम करून दिले तर आणखी चांगले राहील. पोल्ट्रीतील पक्षांबरोबर गाई -म्हशींना देखील अशाच प्रकारे आहार देणं आवश्यक ठरते. पोल्ट्रीच्या, गोठ्याच्या आजूबाजूला असलेल्या उपद्रवी झाडे देखील काढून टाकणे आवश्यक असते. कारण थंडीच्या दिवसात थंड हवा झाडांमधून जात असते. त्यामुळे अशी झाडे काढून टाकणे फायदेशीर ठरते. कोंबड्याचे, गाई जनावराचे अंथरून देखील उबदार ठेऊ शकतो.