Agriculture News : एकीकडे कुक्कुटपालन (Poultry Farm) व्यवसाय भरभराटीस येऊ लागला आहे. कोंबडीपासून मिळणारे अंडे आणि चिकनमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. अशातच कोंबडीपासून आणखी एका घटकापासून लाखोंची कमाई होऊ शकते, याच उत्तम उदाहरण समोर आले आहे. जयपूर येथील राधेश अग्रहरी या तरुणाने कोंबडीपासूनच्या नव्या व्यवसायाची ओळख जगाला करून दिली आहे. ते म्हणजे कोंबडीच्या पिसातुन लोकर आणि कागद निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradeash) फतेहपूर येथील पारंपारिक कुटुंबातील राहणारे राधेश. 2006 मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी पूर्ण केली. टेक्सटाईल डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते बालाजी ओव्हरसीजमध्ये टेक्सटाईल डिझायनर म्हणून रुजू झाले. मात्र त्यांची विषयाबद्दल जाणून घेण्याची धडपड फराळ काळ नोकरीवर तग धरू शकली नाही. म्हणून एका वर्षानंतर, क्राफ्ट्स अँड डिझाइन मध्ये प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असताना एका प्रकल्पावर काम कातरण्याची संधी मिळाली. ज्याद्वारे त्यांना यामध्ये आवड निर्माण झाली आणि पुढील आठ वर्षे त्यांनी त्यांचे संशोधन वस्त्रोद्योग क्षेत्राला समर्पित केले.
अशातच आदिवासी महिलांसमवेत काम करत असताना त्यांच्य्या संशोधनाला चालना मिळाली. कोंबडीच्या पिसापासून लोकरी फायबरचा शोध लावला. 2019 मध्ये त्यांनी मुदिता आणि राधेश प्रायव्हेट लिमिटेड नावाने स्वतःची कंपनी सुरु केली. राधेश सांगतात की, आपल्या देशातील नद्यांची अवस्था बिकट आहे. अनेकदा केर कचरा हा नद्यांमध्ये फेकला जातो. याच अनुषंगाने या प्रकल्पावर काम करण्याचे ठरले. यानुसार कोंबडीच्या पिसांवर काम करण्याचे ठरविले. आजमितीस कंपनीने जयपूर आणि पुणे येथे 150 लोकांना पोल्ट्री कचरा गोळा करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अवघ्या 3 वर्षात 70 हजार किलो पिसे जमा झाली आहेत.
एक किलो पंखांपासून....
प्रथम कोंबडीची पिसे निर्जंतुक केली जातात. यानंतर तो वेगळा करून धागा बनवला जातो. मग धाग्यापासून कापड आणि कागद तयार केला जातो. एका कोंबडीपासून 70 ग्रॅम पिसे येतात. तर 1 किलो पंखापासून 12 टक्के कापड आणि 88 टक्के कागदी साहित्य मिळते. मोठी गोष्ट म्हणजे एक किलो पांढरा कागद तयार करण्यासाठी 200 लिटर स्वच्छ पाणी वापरले जाते. पण कोंबडीच्या पिसापासून कागद बनवण्यासाठी फक्त 10 लिटर पाणी लागते. तसेच, वापरलेल्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी पुन्हा वापरता येईल.