Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्यांना (Poultry Farming) गोलकृमी आणि पट्टकृमी यांचा प्रादुर्भाव होत असतो. कोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते, म्हणून ठराविक कालावधीनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेऊया....
उपाययोजना
- कोंबड्यांना कृमीनाशकाची मात्रा पाणी किंवा खाद्यामधून द्यावी.
- विदेशी कोंबड्यांपेक्षा परसातील कोंबड्यांना गोलकृमी (अस्कॅरीडीया गॅली) आणि पट्टकृमी (रॅलीटीना) यांचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून ठराविक कालावधीनंतर गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकांची मात्रा देणे हे आर्थिकदृष्ट्या परवडते.
- अस्कॅरीडीया गॅली या कृमीबरोबर बऱ्याच कृमींचा प्रादुर्भाव कोंबड्यांना होतो. हे लक्षात घेऊन जंतनाशकाची शिफारशीनुसार मात्रा द्यावी.
- कृमीच्या नियंत्रणासाठी परसबागेमध्ये पाळलेल्या कोंबडी पिलांना एक ते तीन महिन्यांपर्यंत दोन वेळेस जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते.
- मोठ्या कोंबड्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकाची मात्रा एक ते दोन वेळेस द्यावी. यामुळे जंताचा प्रादुर्भाव कमी होऊन वजन आणि अंडी उत्पादनात वाढ होते.
- एका कोंबडीला जंतनाशक औषधी देण्याचा खर्च केवळ दोन ते तीन रुपये येतो.
संकलन : ग्रामीण कृषि मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.