Join us

Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, इथं वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 2:59 PM

Poultry Farm Management : पशुवैद्यकांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेऊया.... 

Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्यांना (Poultry Farming) गोलकृमी आणि पट्टकृमी यांचा प्रादुर्भाव होत असतो. कोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येणे कठीण असते, म्हणून ठराविक कालावधीनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेऊया.... 

उपाययोजना

  1. कोंबड्यांना कृमीनाशकाची मात्रा पाणी किंवा खाद्यामधून द्यावी. 
  2. विदेशी कोंबड्यांपेक्षा परसातील कोंबड्यांना गोलकृमी (अस्कॅरीडीया गॅली) आणि पट्टकृमी (रॅलीटीना) यांचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून ठराविक कालावधीनंतर गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकांची मात्रा देणे हे आर्थिकदृष्ट्या परवडते.                                                                           
  3. अस्कॅरीडीया गॅली या कृमीबरोबर बऱ्याच कृमींचा प्रादुर्भाव कोंबड्यांना होतो. हे लक्षात घेऊन जंतनाशकाची शिफारशीनुसार मात्रा द्यावी.
  4. कृमीच्या नियंत्रणासाठी परसबागेमध्ये पाळलेल्या कोंबडी पिलांना एक ते तीन महिन्यांपर्यंत दोन वेळेस जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते.
  5. मोठ्या कोंबड्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये गोलकृमीनाशक व पट्टकृमीनाशकाची मात्रा एक ते दोन वेळेस द्यावी. यामुळे जंताचा प्रादुर्भाव कमी होऊन वजन आणि अंडी उत्पादनात वाढ होते.
  6. एका कोंबडीला जंतनाशक औषधी देण्याचा खर्च केवळ दोन ते तीन रुपये येतो.

संकलन : ग्रामीण कृषि मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती