Poultry Farming : कुक्कुटपालन, (Kombadi Palan) म्हणजेच कोंबडी पालन, हा एक प्राचीन आणि फायदेशीर व्यवसाय आहे. यात कोंबड्यांचे संगोपन करून अंड्यांचे आणि मांसाचे उत्पादन घेतले जाते. कुक्कुटपालन (Kukkutpalan) व्यवसाय करताना काही महत्वाची लक्षात घ्याव्या लागतात. त्यामाध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करता येतो. आजच्या भागातून जाणून घेऊयात....
कुक्कुटपालन व्यवसायातील महत्वाच्या बाबी :
कोंबड्यांच्या सुधारित जाती, त्यांची निवड व पैदास.
अंडी उत्पादन आणि मांसासाठी योग्य जातींची निवड करावी, जसे की लेअर कोंबड्या (अंडीसाठी) आणि ब्रॉयलर कोंबड्या (मांसासाठी).
जातीची निवड करताना, त्यांची उत्पादकता, रोगप्रतिकारशक्ती आणि इतर गुणधर्म विचारात घ्यावे.
कोंबड्यांचे खाद्य
- अंड्यासाठी लेअर आणि मांसासाठी ब्रॉयलर अशा विविध जाती आहेत.
- तसेच, सुधारित देशी कोंबड्यांचे संगोपन देखील केले जाऊ शकते.
कोंबड्यांची जोपासना, निगा व घरे
- कोंबड्यांना हवा आणि उष्णता यांचा योग्यरित्या सामना करता यावा यासाठी शेड मजबूत आणि हवा खेळती असावी.
- शेडमध्ये तापमान नियंत्रण आवश्यक आहे, विशेषतः बदलत्या हवामानामध्ये.
- शेडमध्ये योग्य वेंटिलेशन आणि प्रकाशव्यवस्था असावी.
कोंबड्यांचे आरोग्य प्रतिबंधक उपाय व औषधे.
- रोगांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.
- तिन्ही हंगामात वेगवगेळ्या पद्धतीचे वातावरण असल्याने कुक्कुटपालनावर परिणाम होतो.
- कोंबड्यांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. नियमितपणे लसीकरण आणि प्रतिबंधक उपाय करा.
- रोगांची लक्षणे दिसल्यास, त्वरित पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
योग्य पद्धतीने व वेळेवर अंड्यांची व मांसाची विक्री
- कुक्कुटपालन व्यवसायात विक्री व्यवसाय महत्वाचा ठरतो.
- वेळच्या वेळी अंड्यांची विक्री करणे, मांसासाठी कोंबड्याची विक्री करणे आवश्यक ठरते.
- तत्पूर्वी बाजाराचा आढावा घ्यावा. बाजारपेठेतील मागणी आणि किंमती यांचा विचार करून उत्पादन योजना तयार करावी.
- उत्पादन योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे.
- - संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव
Poultry Farming : कुक्कुटपालन व्यवसायात कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न मिळतं, जाणून घ्या सविस्तर