Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Poultry Farming : पोल्ट्री शेड उभारणीसाठी जागा निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Poultry Farming : पोल्ट्री शेड उभारणीसाठी जागा निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Latest News Poultry farm Keep these things in mind while choosing place to build poultry shed, read in detail | Poultry Farming : पोल्ट्री शेड उभारणीसाठी जागा निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Poultry Farming : पोल्ट्री शेड उभारणीसाठी जागा निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय करण्याचे ठरविल्यानंतर शेड उभारणीसाठी (Poultry Shed) जागा निवडणे आवश्यक ठरते.

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय करण्याचे ठरविल्यानंतर शेड उभारणीसाठी (Poultry Shed) जागा निवडणे आवश्यक ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय करण्याचे ठरविल्यानंतर शेड उभारणीसाठी (Poultry Shed) जागा निवडणे आवश्यक ठरते. यात जागा कुठे असेल? कोणत्या परिसरात असेल? कोणत्या दिशेला असेल? या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जेणेकरून पुढील काळात पोल्ट्री शेडसाठी (Kukkutpalan) जिकिरीचे ठरणार नाही. आजच्या भागातून जागा निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे समजून घेऊ... 

इतर इमारतीशी संबंध : 
पोल्ट्री हाउस घराजवळ इतकेही नसावे की ते अस्वच्छता निर्माण करेल, पण फार दूरही नसावे कारण दिवसातून तीन वेळा तरी कोंबड्यांना पाणी, खाद्य देणे आणि अंडी गोळा करणे आवश्यक असते.

दिशा : 
ओलसर हवामान असलेल्या भागात पोल्ट्री हाउस दक्षिण किंवा पूर्वेला तोंड करून असावे. यामुळे घरात भरपूर सूर्यप्रकाश येतो. कोंबड्यांना सकाळचा प्रकाश अधिक आवडतो आणि ते सकाळी अधिक सक्रिय असतात.

हेही वाचा : Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेडसाठी 'या' तीन गोष्टी आवश्यक, नक्की अंमलात आणा!

माती आणि निचरा :
पोल्ट्री हाउस थोड्या उतारावर असावे, डोंगराच्या माथ्यावर किंवा खालच्या भागात न ठेवणे योग्य. चांगला निचरा असलेली जमीन आणि सुपीक रेतीमिश्रित माती हवी. अशा जमिनीवर गवत व इतर वनस्पती चांगल्या उगमतात, जे पक्ष्यांसाठी आवश्यक असते. सपाट आणि ओलसर जमिनीवर असेल तर जमिनीची टाईलिंग करून निचरा करावा किंवा कोंबड्यांना पूर्णपणे बंदिस्त ठेवावे.

सावली आणि संरक्षण : 
झाडांनी थंडीत थंडीपासून आणि उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण मिळते. झाडे उंच असावी, पण त्यांचे फांद्या जमिनीलगत नसाव्यात. झुडपे नकोत कारण अशा ठिकाणी माती ओलसर राहते आणि रोगजंतू वाढतात. सूर्यप्रकाश आवश्यक आहे.

-  संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव

Web Title: Latest News Poultry farm Keep these things in mind while choosing place to build poultry shed, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.