Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Poultry Farming : कोंबडीपालनासाठी ब्रायलर की गावरान? अन् कोणती पद्धत बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Poultry Farming : कोंबडीपालनासाठी ब्रायलर की गावरान? अन् कोणती पद्धत बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Latest News Poultry Farming Broiler or barn for chicken farming And which method best Read in detail | Poultry Farming : कोंबडीपालनासाठी ब्रायलर की गावरान? अन् कोणती पद्धत बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Poultry Farming : कोंबडीपालनासाठी ब्रायलर की गावरान? अन् कोणती पद्धत बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Poultry Farming : शेळीपालनाप्रमाणेच कोंबडी पालन व्यवसायातही (Kombadi Palan) तीन पद्धती वापरल्या जातात.

Poultry Farming : शेळीपालनाप्रमाणेच कोंबडी पालन व्यवसायातही (Kombadi Palan) तीन पद्धती वापरल्या जातात.

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Farming :  अलीकडे कोंबडी पालन व्यवसाय चांगलाच वाढीस लागला आहे. शेळीपालनाप्रमाणेच कोंबडी पालन व्यवसायातही तीन पद्धती वापरल्या जातात. यामध्ये बंदिस्त, अर्ध बंदिस्त आणि मुक्त बंदिस्त अशा तीन पद्धती प्रचलित आहेत. या तिन्ही पद्धतीची माहिती घेऊयात.... 

कुक्कुटपालन व्यवसायातील प्रामुख्याने तीन पद्धती -

बंदिस्त पद्धत : 
या पद्धतीत कोंबड्यांना जाळीच्या पिंजऱ्यात किंवा बंद शेडमध्ये ठेवले जाते. या पद्धतीमध्ये, कोंबड्यांना मोकळी हालचाल करता येत नाही, त्यामुळे त्यांना विशेषतः मोठ्या प्रमाणावर खाद्य आणि पाण्याची उपलब्धता असते.

अर्ध-बंदिस्त पद्धत : 
या पद्धतीत कोंबड्यांना काही प्रमाणात मोकळीक मिळते, पण त्यांना पूर्णपणे मुक्त संचार करता येत नाही. या पद्धतीत कोंबड्यांना काही प्रमाणात मोकळीक मिळते, तसेच शेडमध्ये त्यांना खाद्य आणि पाणी देखील उपलब्ध होते.

मुक्त संचार पद्धत : 
या पद्धतीत कोंबड्यांना पूर्णपणे मुक्त संचार करता येतो. त्यांना शेतात फिरण्याची आणि नैसर्गिकरित्या अन्न शोधण्याची मुभा असते. या पद्धतीत, कोंबड्यांच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, कारण त्यांना नैसर्गिकरित्या फिरण्याची आणि अन्न शोधण्याची संधी मिळते.
      
फार्म म्हणजे बंदिस्त कोंबड्या पाळणे. कोंबडीपालन मांसउत्पादनासाठी (ब्राँयलर) व अंडी उत्पादनासाठी अशा दोन प्रकारे करता येते. प्रथम आपण वरील दोनपैकी कोणत्या प्रकारची कोंबडी पाळावयाची हे निश्चित करावे.
      
जर आपणास ब्रायलर कोंबडीपालन करावयाचे असेल तर देशी (गावरान) कोंबडीपेक्षा हायब्रीड कोंबडीपालन फायदेशीर ठरेल. या कोंबड्यांचा वजनवाढीचा दर चांगला असतो, कमी खाद्यामध्ये जास्त मांस उत्पादन देऊ शकतात.
      
सध्या करारपध्दतीने कोंबडीपालन चालवले जाते. या करारपध्दतीमध्ये पिल्लांपासून ते औषधापर्यंत सर्व पध्दतीची मदत देऊ केली जाते. व्यंकटेश्वरा हँचरीज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. सगुणा पोल्ट्री फार्म लि. पुणे. या काही कंपन्या माहिती देऊ शकतात. 


- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव

Poultry Farming :कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी व्हायचंय, 'या' पाच गोष्टी हमखास करा

Web Title: Latest News Poultry Farming Broiler or barn for chicken farming And which method best Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.