Poultry Farming : कोंबडी पालन (Kukkutpalan) हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसायशेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय होतो. कोंबडी पालनाचा (Kombadi Palan) व्यवसाय कसा करावा हे देखील एक शास्त्र आहे. हा व्यवसाय (Poultry Farming) चार प्रकारे सुरु करता येतो. ते आजच्या भागातून जाणून घेऊयात....
उत्कृष्ट जातीची अंडी उबवा उत्कृष्ट जातीची उबवण्याची अंडी (Hatchery) आणावयाची वं ती खुडुक कोंबडी खाली उबवायची. अंडी उबवण्यासाठी चांगल्या अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबडीच्या जातींची निवड करावी लागते. बाजारात काही विशिष्ट जातींची अंडी उबवण्यासाठी चांगली असते. या पद्धतीत पिल्ले वाढवण्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
एक दिवसाच्या पिल्लापासून एक दिवसाची पिल्ले विकत आणावयाची व त्या पिल्लांची योग्य निगा ठेऊन चांगली वाढवायची. (Brooding)कोंबडीची एक दिवसाची पिल्ले विकत आणून त्यांची योग्य काळजी घेऊन वाढवता येते. अशी पिल्ले मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून किंवा खाजगी हॅचरी मधून मिळतात. एक दिवसाची पिल्ले सुदृढ, निरोगी आणि चपळ असावीत.सुरुवातीचे काही दिवस पिल्लांची काळजी घेतली जाते.
तीन महिन्याच्या कोंबड्या तीन महिन्याच्या माद्या (Chicken) विकत आणावयाच्या व व्यवसाय सुरु करायचा.या काळात मादी कोंबड्यांना पुलेट म्हणतात. या वयात त्या अंडी घालत नाहीत. तीन महिन्यांच्या कोंबड्यांना प्रथिनांनी भरलेले खाद्य द्यावे. सहा ते २० आठवड्यांच्या पिलांना ग्रोअर फीडमध्ये बदलले पाहिजे.
अंड्यावर आलेल्या कोंबड्या.... चौथा मार्ग म्हणजे सरळ अंड्यावर (Egg purpose) आलेल्या पाच ते सहा महिन्याच्या माद्या खरेदी करावयाच्या असतात. या पद्धतीमध्ये कोंबड्या जातिवंत व अंडी देणाऱ्या आहेत की नाही हे तपासून घेणे गरजेचे असते.
- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव
Poultry Farming : कुक्कुटपालन व्यवसायात कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न मिळतं, जाणून घ्या सविस्तर