Join us

Poultry Farming : कुक्कुटपालन करताय? ब्रॉयलर शेडमधील नियोजन कसे असावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:01 IST

Poultry Farming : ब्रॉयलर शेडमधील (Broiler Shed) नियोजन कसे असावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... 

Poultry Farming :  शेडची जागा निवडताना दलदलयुक्त जमीन टाळावी, शेडमधील तापमान नियंत्रित करावे, शेडमधील कोंबड्यांना स्वच्छ पाणी पुरवावे, शेडमधील कोंबड्यांच्या (Poultry Farming) व्यवस्थापनासाठी योग्य तापमान राखावे. यासह ब्रॉयलर शेडमधील (Broiler Shed) नियोजन कसे असावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... 

ब्रॉयलर शेडमधील नियोजन

  • नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत. त्यानंतर धुतलेल्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. 
  • भांडी धुताना त्यावर चढलेला चिकट थर व्यवस्थित धुऊन काढावा.
  • कोंबड्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.
  • कोंबड्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार वाढवून द्यावी. कमी जागेमुळे वाढ खुंटते.
  • लिटर ओली झाल्यास त्वरित बाहेर काढून त्याठिकाणी कोरडे, स्वच्छ तूस टाकावे.
  • वेळोवेळी लिटर खालीवर करून घ्यावे, त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • खाद्याची भांडी पूर्णपणे भरू नयेत. भांड्यामध्ये दोन-तृतीयांश एवढे खाद्य भरावे. त्यामुळे वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण राहते.
  • कोंबड्यांना खाद्य दिवसातून तीन-चारवेळा विभागून द्यावे. त्यामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
  • खाद्य साठवून ठेवताना ओलसर, दमट जागी साठवून ठेऊ नये त्यामुळे खाद्यामध्ये बुरशी फैलावण्याची दाट शक्यता असते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेतीकृषी योजना