Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेडसाठी 'या' तीन गोष्टी आवश्यक, नक्की अंमलात आणा!

Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेडसाठी 'या' तीन गोष्टी आवश्यक, नक्की अंमलात आणा!

Latest News Poultry Farming Want to build perfect poultry house Work on these three things | Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेडसाठी 'या' तीन गोष्टी आवश्यक, नक्की अंमलात आणा!

Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेडसाठी 'या' तीन गोष्टी आवश्यक, नक्की अंमलात आणा!

Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेड उभारण्यामागचा उद्देश म्हणजे पक्ष्यांना आराम, संरक्षण, कार्यक्षम उत्पादन

Poultry Farming : परफेक्ट पोल्ट्री शेड उभारण्यामागचा उद्देश म्हणजे पक्ष्यांना आराम, संरक्षण, कार्यक्षम उत्पादन

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Farming : चांगल्या पोल्ट्री हाउससाठी (Poultry House) योग्य जागा निवडणे, चांगला वायुवीजन, योग्य तापमान आणि आर्द्रता, आणि पुरेसा प्रकाश आवश्यक आहे. तसेच, पक्ष्यांना आरामदायक आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. 

शिवाय पोल्ट्रीसाठी (Poultry Farming) चांगले शेड उभारण्यामागचा उद्देश म्हणजे पक्ष्यांना आराम, संरक्षण, कार्यक्षम उत्पादन आणि पोल्ट्रीमॅनसाठी सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून देणे. 

चांगल्या पोल्ट्री हाउसचे आवश्यक घटक : 

आराम : 
सर्वोत्तम अंडी उत्पादन तेव्हाच मिळते, जेव्हा पक्षी आरामदायक आणि आनंदी असतात. यासाठी पोल्ट्री हाउसमध्ये पुरेशी जागा असावी, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार असावे, वारा झेलू नये, स्वच्छ हवाप्रवाह आणि भरपूर सूर्यप्रकाश असावा, तसेच नेहमी कोरडे राहावे. अशा परिस्थितीत कोंबड्या उत्तम प्रतिसाद देतात.

संरक्षण : 
हे पक्ष्यांना चोरीपासून तसेच नैसर्गिक शत्रूंपासून जसे की कोल्हा, कुत्रा, मांजर, घार, कावळा, साप इत्यादींपासून संरक्षण देण्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कोंबड्यांना बाह्य परोपजीवी जसे की गोचिड, उवा, कीटक यांच्यापासूनही वाचवणे गरजेचे आहे.

सोय : 
पोल्ट्री हाउस अशा ठिकाणी असावे जेथून त्याचा उपयोग, देखभाल आणि साफसफाई करणे सोयीचे जाईल. उपकरणांची मांडणी अशी असावी की ती वापरणे आणि स्वच्छ करणे सहज होईल.

- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ, पशू विज्ञान, केव्हीके, मालेगाव

Poultry Farming : कोंबडीपालनासाठी ब्रायलर की गावरान? अन् कोणती पद्धत बेस्ट राहील? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Poultry Farming Want to build perfect poultry house Work on these three things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.